AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Strait Of Hormuz : हॉर्मुजची बातमी येताच आंतरराष्ट्रीय बाजारात महत्वाच्या मोठ्या घडामोडी, झपकन..

Strait Of Hormuz : हॉर्मुज अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाही, तर इराणच्या नियमांवरच चालेलं असं शनिवारी सकाळी इराणचे राष्‍ट्रपती मोहम्मद बगेर गालिबफ म्हणाले. अमेरिकेने इराणी बंदरांवर प्रतिबंध घातले तर हॉर्मुज बंदच राहील असं ते म्हणाले.

Strait Of Hormuz : हॉर्मुजची बातमी येताच आंतरराष्ट्रीय बाजारात महत्वाच्या मोठ्या घडामोडी, झपकन..
Iran-US
| Updated on: Apr 18, 2026 | 11:19 AM
Share

हॉर्मुज खुलं झाल्याच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी पहायला मिळाल्या. कच्चा तेलाचे दर प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर होते. आता अचानक ते कमी झाले आहेत. मार्केट सुरु असताना कच्चा तेलाचे दर 86 डॉलरच्या आसपास आले होते. काही वेळाने प्रति बॅरल कच्चा तेलाचे दर 90 डॉलरच्या पुढे गेले. इराणने म्हटलय की जो पर्यंत सीजफायर लागू आहे, तो पर्यंत कमर्शियल जहाजांना हॉर्मुजमधून जाण्याची परवानगी असेल. ट्रम्प सुद्धा म्हणाले की, आता पुन्हा इराण कधीच हॉर्मुज बंद करणार नाही. इराण यावर सहमत आहे. ही बातमी येताच तेल आणि गॅसच्या किंमती झपकन खाली आल्या.

ब्रेंट क्रूडच्या किंमतीत 10.48 टक्के घसरण होऊन 88.97 डॉलर प्रती बॅरलवर आलेली. सत्रादरम्यान 86.09 डॉलर इतकी खाली किंमत उतरलेली. WTI क्रूड 12.12% घसरुन 83.21 डॉलर प्रति बॅरलवर आलेली. 80.56 डॉलर पर्यंत खाली ही किंमत गेलेली. बाजार बंद होईपर्यंत प्रति बॅरल क्रूड ऑइलची किंमत 90.38 पर्यंत पोहोचलेली. तेलाच्या किंमतीत एकादिवसातील ही मोठी घसरण आहे.

गॅसच्या किंमतीत काय बदल?

गॅसच्या किंमतीतही घसरण झालेली. LNG ची किंमत 2.624 डॉलर झालेली. इराणच्या राष्ट्रपतींकडून अपडेट आल्यानंतर ही किंमत 2.674 डॉलर पर्यंत पोहोचली. म्हणजे नैसर्गिक गॅसच्या किंमतीत फार बदल झाला नाही.

इराणने काय म्हटलय?

हॉर्मुज अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाही, तर इराणच्या नियमांवरच चालेलं असं शनिवारी सकाळी इराणचे राष्‍ट्रपती मोहम्मद बगेर गालिबफ म्हणाले. अमेरिकेने इराणी बंदरांवर प्रतिबंध घातले तर हॉर्मुज बंदच राहील असं ते म्हणाले. सोमवारी याचे तेल, गॅसच्या किंमतीवर परिणाम दिसू शकतो.

भारतीय बाजारात सोमवारी काय घडेल?

स्‍ट्रेट ऑफ हॉर्मुज उघडणार असल्याच्या बातमीमुळे अमेरिकी शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. अमेरिकी बाजार 2 टक्क्यांनी वाढला. भारतीय बाजाराचा इंडिकेटर गिफ्ट निफ्टी सुद्धा शानदार तेजीचे संकेत देत आहे. सोमवारी भारतीय बाजारात जवळपास 300 अंकांचा गॅप पहायला मिळू शकतो. अमेरिका आणि इराणमध्ये येत्या सोमवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये शांतता चर्चा होणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...