
हेनरिएट चक्रीवादळ शनिवारी पुन्हा एकदा अधिक वेगवान बनलं आहे. मात्र सध्या हे चक्रीवादळ जमिनीपासून खूप दूर असल्यामुळे मानवी वस्तींना या चक्रीवादळाचा फार धोका नसल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मियामीमधील राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ सध्या हिलो शहरापासून सुमारे हजार किलोमीटर पूर्वेला आहे, आणि ते ताशी 50 किलोमीटर वेगानं पच्छिम -उत्तरेकडे सरकत आहे. पुढील एक ते दोन दिवसांमध्ये ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता आहे. सध्या तरी या चक्रीवादळापासून कोणताही धोका नाही, मात्र हे चक्रीवादळ शक्तिशाली बनल्यास मोठा तडाखा बसू शकतो.
दरम्यान सध्या जगावर दोन चक्रिवादळाचं संकट घोगांवत आहे, दुसरं चक्रीवादळ आइओ देखील प्रशांत महासागरात तयार झालं आहे, हे चक्रीवादळ मेक्सिकोच्या दक्षिण -पश्चिमेच्या दिशेनं पुढे सरकत आहे. या चक्रीवादळाचा वेग प्रति तास 85 कीमी एवढा प्रचंड आहे. हे चक्रीवादळ कॅलिफोर्नियाच्या किनार्यापासून जवळपास 425 किलोमीटर दूर आहे, हे चक्रीवादळ सध्या पश्चिम -दक्षिणेकडे सरकत आहे.
दरम्यान सध्या तरी या चक्रीवादळाचा जगाला फार मोठा धोका नाहीये, मात्र जर चक्रीवादळानं दिशा बदलली तर त्याचा मोठा फटका बसू शकतो. मात्र सध्या तरी या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणताही सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला नाहीये. परंतु या चक्रीवादळामुळे समुद्रात प्रचंड मोठ्या लाटा उसळणार असून, मच्छिमारांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान होतं, चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसतो, काही भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होऊन नद्यांना पूर येतात. या पुरामुळे मोठं नुकसान होतं. सध्या तरी हे दोन्ही चक्रीवादळ खोल समुद्रात असल्यामुळे त्यापासून फार मोठा धोका नाही, मात्र त्यांनी दिशा बदलल्यास मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. या दोन्ही चक्रीवादळाचा भारतावर कोणताही परिणा होणार नाहीये.
देशात मुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे, याचा परिणाम म्हणून उद्यापासून देशासह राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.