नेपाळमध्ये महापुराने हाहाकार! 105 भारतीयांसह तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त

नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे खळबळ उडाली आहे. या पुरामुळे रसुवा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर समोर आलेल्या व्हिडिओंमधून या नैसर्गिक आपत्तीची भीषणता दिसून येत आहे.

नेपाळमध्ये महापुराने हाहाकार! 105 भारतीयांसह तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त
Nepal Flood 105 Indian Missing
Image Credit source: Google
| Updated on: Aug 26, 2026 | 4:03 PM

नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे खळबळ उडाली आहे. या पुरामुळे रसुवा आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात हाहाकार माजला आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक पातळीवर समोर आलेल्या व्हिडिओंमधून या नैसर्गिक आपत्तीची भीषणता दिसून येत आहे. काही ठिकाणी शांत वाहणाऱ्या नद्या काही क्षणांतच रौद्र रूप धारण करताना दिसत आहेत, तर अनेक ठिकाणी पूल, रस्ते, वाहने आणि इमारती पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून जाताना दिसत आहेत. आतापर्यंत या पुरामुळे 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पुरात 105 भारतीय पर्यटक बेपत्ता झाले आहेत.

105 भारतीयांसह 400 लोक बेपत्ता

नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे 105 भारतीय पर्यटक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये 31 तीर्थयात्रींचा समावेश असून ते मानसरोवर यात्रेसाठी जात होते. ही माहिती नेपाळ टुरिझम बोर्डाने दिली आहे. बोर्डाकडून बेपत्ता झालेल्या भारतीय पर्यटकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. नेपाळ टुरिझम बोर्डाच्या माहितीनुसार, पुरात एकूण सुमारे 400 पर्यटक बेपत्ता झाले आहेत. यामध्ये 291 परदेशी पर्यटक आहेत, तर 90 हून अधिक पर्यटक नेपाळचे नागरिक आहेत. नेपाळ न्यूजच्या माहितीनुसार, बेपत्ता पर्यटकांपैकी 37 जण भारतीय वंशाचे एनआरआय आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, अमेरिका, मलेशिया, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचाही बेपत्ता पर्यटकांमध्ये समावेश आहे.

नेपाळ टुरिझम बोर्डाच्या माहितीनुसार, बेपत्ता भारतीय पर्यटकांपैकी 59 जण स्मार्ट ट्रॅव्हल्स या संस्थेसोबत प्रवास करत होते. तर 46 पर्यटक लीफ हॉलिडेच्या माध्यमातून नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेले होते. आता नेपाळ सरकारने अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी 1144 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.

12 हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य

नेपाळी लष्कराच्या माहितीनुसार, आतापर्यंत 12 जणांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. यामध्ये स्याफ्रुबेसी येथून 6, मैलुंग येथून 2 आणि धुन्चे येथून 4 जणांचा समावेश आहे. बचावकार्याला वेग देण्यासाठी नेपाळी लष्कराची 4 हेलिकॉप्टर आणि खासगी क्षेत्रातील 8 हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत. पुरात अडकलेल्या आणखी 5 जणांची सुटका करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Follow Us