AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कमालच झाली ! ज्या बिसलेरीच्या विरोधात FSSAI ने रान उठवले आणि त्यांच्याच सेमिनारमध्ये टेबलांवर तोच ब्रँड..!

एकीकडे देशातील सर्वात मोठा बाटलीबंद पाण्याचा ब्रँड बिसलेरीवर बंदी घातल्याच्या बातम्याने खळबळ उडाली असताना त्याच दिवशी गाजियाबाद येथे झालेल्या मानक संस्थेच्या कार्यक्रमा बिसलेरीच्याच पॅकबंद पाण्याच्या बाटल्या वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कमालच झाली ! ज्या बिसलेरीच्या विरोधात  FSSAI ने रान उठवले आणि त्यांच्याच सेमिनारमध्ये टेबलांवर तोच ब्रँड..!
India's food safety watchdog, FSSAI baned bisleri brand
| Updated on: Nov 25, 2026 | 7:39 PM
Share

देशातील सर्वात मोठा बाटलीबंद पाण्याच्या ब्रँड असलेल्या बिसलेरी कंपनीवर फूड सेफ्टी एंड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) कारवाई केल्यानंतर आता एक मजेशीर प्रकार उघडकीस आला आहे. गाझियाबादच्या NTCFSS मध्ये FSSAI ने आयोजित केलेल्या एक दिवसीय ट्रेनिंग प्रोग्रॅममध्येच टेबलावर बिसलेरीचे पॅकेज्ड वॉटरचा वापर केल्याचे उघडकीस आले आहे. या कार्यक्रमात केंद्रीय आणि राज्य खाद्य सुरक्षा प्राधिकरणे 1,155 खाद्य सुरक्षा संस्थांनी भाग घेतला होता.

हा प्रशिक्षण कार्यक्रम फूड सेफ्टी एंड स्टँडर्ड ( प्रोहिबिशन एंड रिस्ट्रिक्शन्स ऑन सेल्स) शी जुडलेल्या नियमांवर आयोजित केला होता. या दरम्यान बिसलेरीच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी देशव्यापी टेहळणी आणि एका बॅचच्या विक्रीवरील बंदीचे प्रकरण देखील चर्चेत आहे.

बिसलेरीच्या एकाच बॅचलाच बंदी

बिसलेरी इंटरनॅशनलने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की FSSAI च्या वतीने 23 नोव्हेंबरला दिलेल्या स्पष्टीकरणाचे स्वागत केले आहे. कंपनीच्या मते गोवा प्लांटमध्ये १४ महिन्याआधी तयार केलेल्या एका बॅचच्या सँपल संदर्भात स्पष्टीकरण मागितले होते.

कंपनीने सांगितले की FSSAI ची विक्रीवरील बंदी केवळ एकाच बॅच GO 270 वर लागू आहे. ही बॅच २७ सप्टेंबर २०२५ च्या गोवा प्लांटमध्ये तयार केली होती. बिसलेरीच्या मते कंपनी दरवर्षी ५० हजाराहून जास्त बॅच तयार करते आणि संबंधित बॅचचा कोणताही स्टॉक सध्या बाजाारात उपलब्ध नाही. कंपनीने आपल्या सर्व १४३ प्लांटमध्ये गुणवत्ता आणि खाद्य सुरक्षेचा उच्च मानकांना कायम राखण्याची प्रतिबद्धता दाखवली आहे.

पान मसालावर FSSAI ची कारवाई

सेलिब्रिटीद्वारे पान मसाला आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडच्या जाहीराती संदर्भातही FSSAI चे CEO राजित पुनहानी यांनी आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की नैतिकतेचा मुद्दा मुख्य रुपाने भ्रामक दावे आणि जाहीरातींशी जोडलेला आहे. त्यांच्या मते अल्ट्रा -प्रोसेस्ड फूडच्या जाहीराती करणाऱ्या प्रसिद्ध व्यक्तींसंदर्भात एजन्सीने केलेल्या कारवाईचा चांगला परिणाम झाला आहे. अनेक लोकांनी आपल्या जाहीराती हटवल्या आहेत. ते म्हणाले की पान मसालाच्या संबंधित प्रकरणांना महाराष्ट्रातील संस्था काम करत आहेत.

Follow Us
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंड...
पुण्यात कोर्टाबाहेर मंदार किवळेंवर गोळीबार अन् कोयत्याने वार; दौंडमधून 5 आरोपी जेरबंद!
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची...
डोंबिवलीत रिक्षाचालकांची मनमानी? कोणतीही परवानगी न घेता 5 रुपयांची भाडेवाढ, प्रवासी संतप्त!
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन
शक्तीपीठ प्रकल्पाच्या मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; नेवरीत आंदोलन, अनेकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून...
पुणे कोर्ट हल्ला प्रकरणी बावनकुळे आक्रमक; म्हणाले, आरोपींना शोधून काढणार, कोणालाही सोडणार नाही!'
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला..
नाना नानी पार्कच्या वृक्षतोडीविरोधात आदित्य ठाकरे मैदानात; आंदोलनाला दिला पाठिंबा!
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त...
परभणीच्या ब्राह्मणगावात पाण्यासाठी वणवण! 3,500 ग्रामस्थांची भिस्त एकाच विहिरीवर
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट...
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली! आरोप-प्रत्यारोपांनंतर थेट तालुकाप्रमुखांची पक्षातून हलाकपट्टी, नेमकी भानगड काय?
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला...
पवार कुटुंबावर लक्ष्मण हाके बरसले; रोहित पवारांच्या शेतकरी मोर्चाला म्हणाले 'ढोंगीपणा'!
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याचा व्हिडीओ...
50 लाखांच्या रोकडीनं राजकारणात खळबळ! शिंदे गटातील नेत्याच्या व्हिडिओमुळे मनसे आक्रमक, चार ठिकाणी तक्रार
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? सिब्बल यांचा युक्तिवाद काय
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला बदलला असता? कपिल सिब्बल यांचा कोर्टात मोठा युक्तिवाद!