
हिरा एक अशी मौल्यवान वस्तू आहे की त्याचे नाव घेताच भल्याभल्या लोकांचे डोळे विस्फारतात आणि नियत फिरते. तुम्ही अनेक चोरीच्या घटना ऐकल्या असतील. परंतू जगातील सर्वात मोठी चोरी कोणती होती.? जर माहिती नसेल तर चला वाचूयात जगातील सर्वात मोठी चोरीची घटना कशी आणि कधी घडली होती ?
ही घटना बेल्जियम शहरातील एंटवर्प ( Antwerp World Diamond Centre’s vault ) येथे घटली होती. आणि साल होते 2003 फेब्रुवारीचा महिना होता. एंटवर्प ज्यास हिऱ्याची राजधानी म्हटले जाते. येथील सर्वात सुरक्षित तिजोरी एंटवर्प वर्ल्ड डायमंड सेंटर वॉल्टना टार्गेट करण्यात आले होते. ही चोरी इतक्या चलाखीने केली होती की यास शतकातील सर्वात मोठी चोरी म्हटले जाते. या चोरीचा मास्टरमाईंड होता ( Leonardo Notarbartolo ) ‘लियोनार्डो नोतरबार्तोला ‘.
लियोनार्डो नोतरबार्तोलो हा कोणी साधारण चोर नव्हता, त्याने या चोरीची योजना दोन वर्षे केली होती. त्याने दोन दिवसात जगातील सर्वात मोठ्या चोरीचा कट प्रत्यक्षात आणला.त्याने त्यांची टीम मोठ्या सावधानतेने निवडली. टीमला नाव दिले ‘स्कूल ऑफ ट्यूरिन’. या टीमचे प्रत्येक सदस्य कोणत्या ना कोणत्या कामात माहिर होता. कोणी टाळा तोडण्यात उस्ताद होता. तर कोणी हायटेक डीव्हाईस चालवण्यात माहीर होता.15-16 फेब्रुवारी 2003 रोजी रात्री ही चोरी झाली.
एंटवर्प वर्ल्ड डायमंड सेंटरची तिजोरीला जगातील सर्वाधिक सुरक्षित तिजोरी मानले जात होते. परंतू नोतरबार्तोलो आणि त्याच्या टीमने सर्व सुरक्षा भेदत हे काम तडीस नेले. त्यांनी सुरक्षा कॅमेऱ्यांनाही चकमा देण्यासाठी हेअर स्प्रेचा वापर केला. तिजोरी उघडण्यासाठी डुप्लिकेट चाव्या तयार केल्या. त्यांची चलाखी अशी होती की कोणताही सेंसर त्यांना पकडू शकला नाही.या चोरीत सुमारे 100 दशलक्ष डॉलरचे हिरे, सोने आणि मौल्यवान दागिने चोरले गेले. भारतीय रुपयात ही रक्कम 8,77,28,68,680 रुपये होते.
चोरी झाल्यानंतर तिजोऱ्यांची अवस्था
Antwerp World Diamond Centre’s vault
लियोनार्डो नोतरबार्तोलो याची कहाणी रंजक आहे. त्याने सहा वर्षांचा असताना चोरी करायला सुरुवात केली होती. त्याने 1958 मध्ये जेव्हा त्याच्या आईने दूध आणायला पाठवले तेव्हा दूधवाल्याच्या झोपेचा फायदा उचलत त्याच्याकडील गल्ल्यातून 5,000 लीरा (सुमारे 8 डॉलर)चोरले.साल 2000 मध्ये त्याने डझनावारी चोऱ्या केल्या, परंतू एंटवर्पच्या चोरीने त्याला जगभरात प्रसिद्ध केले.
हैराणीचा गोष्ट म्हणजे या चोरीचा मुद्देमाल आजपर्यंत सापडलेला नाही. नोतरबार्तोला याला काही पुराव्यांच्या आधारे 10 वर्षांची शिक्षा झाली. परंतू त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही.त्याने पत्रकारांशी या प्रकरणात बोलण्यासही नकार दिला. तो म्हणायचा की कला सिद्ध करण्यासाठी मी चोरी करत असतो पैशासाठी नाही. ही चोरी आजही लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. नोतरबार्तोलो आणि त्याच्या टीम सुरक्षेचे कडे मोडत कशी चोरी केली ही कहानी चित्रपटापेक्षाही रंजक आहे.