AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विंडिजविरुद्धच्या अतितटीच्या लढतीत रिंकु संजू सॅमसनची बॅट घेऊन गेला, पटकन लक्षात आलं अन्… Video

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुपर 8 फेरीचा शेवटचा सामना झाला. या सामन्यात शेवटच्या षटकात भारताने विजय मिळवला. 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता असताना संजू सॅमसनने षटकार आणि चौकार मारत संघाला विजयी केलं. पण यापूर्वी एक मजेदार किस्सा घडला.

विंडिजविरुद्धच्या अतितटीच्या लढतीत रिंकु संजू सॅमसनची बॅट घेऊन गेला, पटकन लक्षात आलं अन्... Video
रिंकु संजू सॅमसनची बॅट घेऊन गेला, पटकन लक्षात आलं अन्... VideoImage Credit source: PTI
| Updated on: Mar 02, 2026 | 8:05 PM
Share

टी20 वर्ल्डकप सुपर 8 फेरीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात रिंकु सिंहला जागा मिळाली नाही. झिम्बाब्वेविरुद्ध खेळलेला संघच वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात उतरला. करो या मरोच्या सामन्यात वेस्ट इंडिजने 196 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. हे आव्हान वाटतं तितकं सोपं नव्हतं. त्यात भारताने या धावांचा पाठलाग करताना पावर प्लेमध्ये 2 विकेट गमावल्या होत्या. त्यामुळे टीम इंडियावर प्रेशर वाढलं होतं. पण संजू सॅमसनने टीम इंडियाचा डाव सावरला आणि विजयाच्या वेशीवर आणलं. या सामन्यात धावांचा पाठलाग सुरू असताना एक ब्रेक घेतला. या ब्रेकमध्ये संजू सॅमसनसाठी कुलदीप यादव आणि रिंकु सिंह पाणी आणि टॉवेल घेऊन आला. रिंकुने संजू सॅमसनला पाणी पाजलं. पण त्यानंतर जे काही घडलं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार हे मात्र खरं.. कारण रिंकु सिंह संजू सॅमसनची बॅट घेऊन तंबूत चालला होता. खरं तर या दोघांच्या हा प्रकार तात्काळ लक्षात आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओनुसार, रिंकु सिंहच्या खांद्यावर टॉवेल होते. त्याने हातातली पाण्याची बाटली संजू सॅमसनकडे दिली. त्याने पाणी प्यायले आणि रिंकुकडून तोंड पुसण्यासाठी टॉवेल घेतला. तोंड पुसताना त्याने हातातली बॅट रिंकुकडे दिली. रिंकुने बॅट खाकेत पकडली. संजूने तोंड पुसल्यानंतर टॉवेल त्याच्या खांद्यावर ठेवला आणि पुढे निघून गेला. रिंकु पण तंबूकडे चालता झाला. पण तेवढ्यात संजूच्या लक्षात आलं की बॅट नाही. त्याने रिंकुला हाक मारली आणि हसतच त्याच्याकडून बॅट घेतली.

संजू सॅमसनने त्यानंतरही आक्रमक बाणा कायम ठेवला. संजू सॅमसनने नाबाद 97 धावांची खेळी केली. यात त्याने 12 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे टीम इंडियाचा विजय सोपा झाला. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना 5 विकेट राखून जिंकला. यासह टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. हा सामना 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

Follow Us
जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं; जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर...
Devendra Fadnavis | जात प्रमाणपत्र मागितलं की मिळतं!; मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर फडणवीसांचं मोठं विधान
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
अखेर परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर... लोकसभेत प्रचंड गदारोळ
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी,
गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साईबाबा मंदिरात भाविकांची गर्दी, रक्तदान शिबिराचे आयोजन
स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या वक्तव्याने सभागृहात गदारोळ
Rahul Gandhi | स्टुडंट, इडियट, अंधभक्त... राहुल गांधींच्या एका वक्तव्याने सभागृहात प्रचंड गदारोळ
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा