AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाजच काढली… कंगना रणौतच्या गटार छाप वक्तव्यावर सोनू सूद संतापला

सध्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही चांगलीच चर्चेत आहे. तिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. आता यावर अभिनेता सोनू सूदने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

लाजच काढली... कंगना रणौतच्या गटार छाप वक्तव्यावर सोनू सूद संतापला
Kangana and SonuImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 29, 2026 | 3:48 PM
Share

सध्या अभिनेत्री कंगना रणौत ही चांगलीच चर्चेत आहे. तिने हिंदू तरुणींवर केलेल्या वक्तव्यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. आताच्या पिढीमधील हिंदू तरुणीया गटार छाप आहेत, ड्रग्ज घेणे, दारू पिणे आणि अनेक लोकांशी शारीरिक संबंध आहेत असे कंगना म्हणाली. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. आता यावर बॉलिवूडचा सुपरहिरो म्हणून ओळख असलेला अभिनेता सोनू सूद लाजच काढली असे स्पष्ट म्हणाला आहे.

सोनू सूद काय म्हणाला?

नुकताच सोनू सूदने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने कंगनाने केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मी त्यांचे वक्तव्य ऐकले नाही… मात्र हेच युवा एखाद्याला अभिनेता बनवतात. त्यामुळे युवक बरोबर असतील तर तुम्ही राहाल अन्यथा खूप त्रास होऊ शकतो. तुम्ही अँक्टर असाल किंवा डॉक्टर जो पर्यंत जनता तुमच्या बरोबर तो पर्यंत तुमचे अस्तित्व आहे.”

वाचा: अभिजीत दीपकेला परदेशात शिक्षण घेण्यासाठी कोणी दिली पैसे?

पुढे तो म्हणाला, “जर कंगना राणौतने चुकीचे वक्तव्य केले असेल तर शर्मेची गोष्ट. असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. त्यामुळे बोलायच्या आधी विचार केला पाहिजे. कारण जनताच देवाचे रूप”, असे सोनू सूद म्हणाला.

काय म्हणाली होती कंगना?

कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला पोस्ट शेअर केली होती. यामध्ये तिने “मी त्यांना गटर पिढी म्हणते, जी तथाकथित वेस्टर्न कल्चर स्वीकारलेल्या भारतीय स्त्रियांची नवी पिढी आहे. यांचा ना अभ्यास चांगला असतो, ना त्या सुंदर असतात आणि ना त्यांची मानसिकता चांगली असते. या इतक्या भ्रष्ट मानसिकतेच्या असतात की त्या चांगली गृहिणी देखील होऊ शकत नाहीत. यांच्याकडे समाजाला देण्यासारखे काही नसते. तरीही ड्रग्ज घेणे, दारू पिणे आणि अनेक लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्याच्या आपल्या स्वातंत्र्याचे प्रदर्शन गर्वाने करतात. या स्वतंत्र न होताही सतत स्वतंत्र जीवनासाठी संघर्ष करत राहतात आणि आपल्या पालकांच्या कमाईवर जगत राहतात. स्वतंत्र आयुष्य कमावावे लागते. तुम्ही बिघडलेल्या विचारांच्या गटर छाप व्यक्ती आहात. जर तुम्ही जबाबदाऱ्या न घेता स्वतंत्र आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असाल तर” असे म्हटले होते.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा