उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट… राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. इतर पक्षांवर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील बाबींवर लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला.
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. इतर पक्षांवर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील बाबींवर लक्ष द्यावे, असा टोला त्यांनी लगावला. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी काही बड्या नेत्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर भाष्य केले होते. त्यानंतर नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याबाबत प्रश्न उपस्थित केले.
नवनाथ बन म्हणाले, “राऊतांनी दुसऱ्या पक्षांची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षातील आणि ताफ्यातील गोष्टींकडे लक्ष द्यावे.” तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाहनांबाबतही प्रश्न उपस्थित करत, “उद्धव ठाकरे न मंत्री आहेत, ना आमदार आहेत, ना खासदार आहेत. तरी त्यांच्या आणि त्यांच्या चिरंजीवाच्या ताफ्यात किती मर्सिडीज आहेत, त्या राऊतांनी येऊन सांगाव,” असे वक्तव्य केले.
नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्या आणि संपत्तीबाबतही प्रश्न उपस्थित केले. या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या आरोपांवर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 29, 2026 01:39 PM
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...

