दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट अमित शाहांच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडत असून, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संसद भवनात भेट घेतली आहे. लोकसभेचं कामकाज दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आल्यानंतर ही बैठक झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेतील कामकाज स्थगित झाल्यानंतर किरण रिजिजू थेट अमित शाह यांच्या भेटीसाठी गेले. या भेटीमागील नेमकं कारण अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आलेलं नसले, तरी संसदेतील सुरू असलेल्या घडामोडींशी या बैठकीचा संबंध असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, लोकसभेत महत्त्वाच्या विधेयकावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सभागृहात उपस्थित नसल्याचा मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. यावरून सभागृहात गदारोळही पाहायला मिळाला.
याच पार्श्वभूमीवर किरण रिजिजू आणि अमित शाह यांच्यात झालेल्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, पुढील संसदीय रणनीती किंवा विधेयकासंदर्भातील चर्चेवर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, बैठकीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Published on: Jul 29, 2026 03:36 PM
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...