हुतींनी गावठी मिसाईलने सौदीचे F-15 फायटर जेट उडवले?, ट्रम्पना मोठा धक्का

हुती बंडखोरांनी सौदी अरबवर हल्ले सुरु केले आहे. सौदी अरबने संरक्षणासाठी पाकिस्तानसोबत करार केला आहे. मात्र, पाकिस्तानने अद्याप या संघर्षात सौदीच्या बाजूने उडी न घेतल्याने सौदीने आता इस्रायलला पाचारण केले आहे.

हुतींनी गावठी मिसाईलने सौदीचे F-15 फायटर जेट उडवले?, ट्रम्पना मोठा धक्का
Donald trump
| Updated on: Sep 16, 2026 | 5:19 PM

सौदी अरबवर हल्ले करुन त्यांना बेजार करणाऱ्या हुती बंडखोरांनी असा दावा केला आहे की त्याने डोनाल्ड ट्रम्पचे डोके सुन्न झाले आहे. येमेनच्या मारिब भागातून एक मोठा सैन्य दावा केला जात आहे. हुती सैन्य दलाचे प्रवक्ते याह्या सरी म्हटले आहे की सौदी अरबच्या एका F-15 लडाऊ विमानाला खाली पाडले आहे. मात्र, या दाव्याला सौदी अरबच्या वतीने तात्काळ दुजोरा दिलेला नाही. मात्र हे खरे असेल तर हुतीकडे असलेल्या शस्रास्रांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

अल जझीराच्या बातमीनुसार हुती सैन्य दलाचे प्रवक्ते याह्या सरी यांनी सांगितले की ही घटना येमेनच्या मारिब गव्हर्नरेटच्या हवाई क्षेत्रात झाली आहे. असा दावा केला जात आहे की सौदी लढाऊ विमाने येमेनमध्ये सुरु असलेल्या सैन्य हालचालींच्या विरोधात कारवाई करत होते. याच दरम्यान हुतींनी या विमानाला टार्गेट केले. हुती प्रवक्त्याने म्हटले आहे की विमानाला स्थानिक पातळीवर तयार करण्यात आलेल्या जमीनीवरुन हवेत मारा कणाऱ्या मिसाईल सिस्टीमच्या मदतीने पाडले गेले आहे. विद्रोही गटाचे म्हणणे आहे की ही कारवाई येमेनच्या विरोधात सुरु असलेल्या सैन्य कारवाईला उत्तर म्हणून केली आहे.

सौदीने दुजोरा दिला नाही…

स्थानिक सूत्रांच्या हवाल्याने म्हटले गेले की लडाऊ विमानाला मारिबच्या उत्तर-पश्चिम स्थित माऊंट हेलानच्या जवळ टार्गेट केले गेले. मात्र, विमानाच्या पायलटला काय झाले आणि विमानाच्या ढीगाऱ्याची काय स्थिती आहे, याची तात्काळ कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेले नाही. या पूर्ण घटनाक्रमावर सौदी नेतृत्वावाल्या सैन्य आघाडीच्या वतीने तात्काळ कोणतीही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या F-15 या विमानाला पाडल्याच्या बातमीला हुतींचा दावा असेच म्हटले जात आहे. मारिब दीर्घकाळ येमेनच्या संघर्षात धोरणात्मक रुपाने महत्वपूर्ण क्षेत्र राहिले आहे.

F-15 साधारण लढाऊ विमान नाही…

सौदीकडे असलेले F-15 हे विमान जगातील सर्वात अत्याधुनिक विमान म्हटले जाते. हे विमान अमेरिकेने सौदीला विकलेले आहे.सौदीकडे या विमानाचा मोठा ताफा आहे. इतक्या अत्याधिक विमानाला हुती बंडखोरांनी जर टार्गेट केले असेल तर याचा मोठा धक्का अमेरिकेला खास करुन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बसणार असे म्हटले जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us