Balen Shah : अमेरिकेनं नेपाळमध्ये केला सत्तापालट, बालेन शाहांवर 20 मिलियन डॉलरचा खर्च?

नेपाळला नुकताच मोठ्या पुराचा फटका बसला आहे, त्यानंतर आता नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे नेपाळच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे.

Balen Shah : अमेरिकेनं नेपाळमध्ये केला सत्तापालट, बालेन शाहांवर 20 मिलियन डॉलरचा खर्च?
Balen Shah
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 22, 2026 | 3:42 PM

नेपाळला नुकताच मोठ्या पुराचा फटका बसला आहे, त्यानंतर आता नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांमुळे नेपाळच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. काही महत्त्वाच्या फाइल्स समोर आल्या आहेत. गेल्या वर्षी नेपाळमध्ये जे सत्तापरिवर्तन झालं, त्यामागे अमेरिकेचा हात होता, अशी माहिती या फाइल्समधून समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच बालेन शाहा यांना अमेरिकेनेच पंतप्रधानपदी प्लांट केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. एकीकडे नेपाळला महापुराचा मोठा फटका बसला आहे, या काळात नागरिकांना मदत पोहोचवण्यास विलंब झाला, रेस्क्यू ऑपरेशन्स देखील विलंबाने सुरू झाले त्यामुळे त्याचा राग नागरिकांच्या मनात आहे, तर आता दुसरीकडे बालेन शाह यांच्यावर खळबळजनक आरोप झाल्याने आता नेपाळमध्ये वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

समोर आलेल्या या रिपोर्टमुळे नेपाळमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बालेन शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अमेरिकेनेच सत्तेत आणलं असा आरोप करण्यात आला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार द ग्रे झोनच्या या रिपोर्टमध्ये नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नेपाळमध्ये चीन आणि अमेरिकेचे गुप्तचर विभाग कार्यरत असून, ते आपल्या फायद्यासाठी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मात्र अजूनही या रिपोर्टच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीची कोणतीही पुष्ठी करण्यात आलेली नाहीये.

गेल्या वर्षी नेपाळमध्ये जेन झेडचं मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोलनानंतर तत्कालीन पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये बालेन शाह यांचा पक्ष सत्तेत आला. बालेन शाह यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली, मात्र त्यानंतर आता बालेन शाह यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बालेन शाह यांच्या पंतप्रधानपदामागे अमेरिकेचा हात आहे, असा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. बालेन शाह यांच्याव गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बालेन शाह आणि लामिछाने यांच्यावर तब्बल 20 मिलियन डॉलरचा खर्च झाला असा दावा देखील करण्यात येत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us