AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आणखी एक दणका, ‘या’ 6 कंपन्यांवर घातली बंदी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांपूर्वी भारतावरील वस्तूंवर 25% कर लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता अमेरिकेने भारताला आणखी एक दणका दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला आणखी एक दणका, 'या' 6 कंपन्यांवर घातली बंदी
donald trump
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 01, 2025 | 4:21 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांपूर्वी भारतावरील वस्तूंवर 25% कर लावण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता अमेरिकेने भारताला आणखी एक दणका दिला आहे. इराणकडून तेल आणि पेट्रोकेमिकल पदार्ख खरेदी करणाऱ्या 6 भारतीय कंपन्यांवर बंदी घालण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अमेरिकेने एकूण 20 जागतिक कंपन्यांवर ही कारवाई केली आहे. इराणवर दबाव आणण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

इराणसोबत व्यापार करणाऱ्या कंपन्यांवर बंदी

भारतातील सहा कंपन्यांसह जगातील 20 कंपन्यांवर अमेरिकेने बंदी घातली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एक निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. यात अमेरिकेने म्हटले की, ‘या भारतीय कंपन्यांनी इराणी पेट्रोलियम उत्पादनांची खरेदी करत होत्या, हे अमेरिकेच्या निर्बंधांचे उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निवेदनात अमेरिकेने म्हटले की, “इराण सरकार या व्यापारातून मिळालेल्या पैशांचा वापर परदेशी दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या नागरिकांवर अत्याचार करण्यासाठी करत आहे. त्यामुळे इराणची आर्थिक कोंडी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

भारतीय कंपन्यांची मालमत्ता जप्त होण्याची शक्यता

अमेरिकेने या 6 भारतीय कंपन्यांवर बंधी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता या कंपन्यांची अमेरिकेतील मालमत्ता जप्त केली जाण्याची शक्यता आहे. तसेच आता कोणतीही अमेरिकन कंपनी या 6 कंपन्यांसोबत व्यवहार करणार नाहीत.

या कंपन्यांवर बंदी

  • कांचन पॉलिमर्स
  • अल्केमिकल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड
  • रमनिकलाल एस. गोसालिया अँड कंपनी
  • ज्युपिटर डाई केम प्रायव्हेट लिमिटेड
  • ग्लोबल इंडस्ट्रियल केमिकल्स लिमिटेड
  • पर्सिस्टंट पेट्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड

अमेरिकेची इराणविरुद्ध कडक भूमिका

इराण आणि अमेरिकेत तणावाचे वातावरण आहे. 2015 च्या अणुकरारातून माघार घेतल्यापासून अमेरिका इराणवर सतत आर्थिक निर्बंध लावत आहे. इराणच्या ऊर्जा आणि वित्तीय क्षेत्रांवर विविध निर्बंध लादण्यात आलेले आहेत. याच धोरणाचा एक भाग म्हणून आता हे पाऊस उचलण्यात आले आहे. इराणच्या तेलाच्या उत्पन्नावर मर्यादा घालण्यासाठी अमेरिका असे निर्णय घेत असल्याचे समोर आले आहेत.

भारत-अमेरिकेतील तणाव वाढण्याची शक्यता

रशियाकडून तेल खरेदी करण्याची शिक्षा म्हणून अमेरिकेने भारतावर 25% कर लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर आता 6 कंपन्यांवर बंदी घालण्यात आलेली आहे. आता या दोन्ही निर्णयांमुळे भारत-अमेरिकेतील व्यापारी संबंध बिघडण्याची शक्यता आहे.

Follow Us
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!