Donald Trump : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला दिलासा देणारं, मनातली भिती दूर करणारं सकारात्मक वक्तव्य

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला दिलासा देणारं मोठं वक्तव्य केलं आहे. नक्कीच त्यामुळे जगाचं टेन्शन कमी होईल. जगातील अनेक देशांना जी भिती आहे तसं काही घडणार नाही. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर पोस्ट केली.

Donald Trump : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं जगाला दिलासा देणारं, मनातली भिती दूर करणारं सकारात्मक वक्तव्य
Donald Trump
| Updated on: Jul 09, 2026 | 12:35 PM

इराणी नेते आजारी मानसिकतेचे लोक असून त्यांच्यासोबतच सीजफायर संपल्याचं मी जाहीर करतो असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं. त्यांच्या या घोषणेने जगाचं टेन्शन वाढवलं. आता पुन्हा एकदा इराण-अमेरिका युद्ध भडकणार असचं सर्वांना वाटतय. पण आज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगाला दिलासा देणारं वक्तव्य केलं आहे. “इराणसोबत पुन्हा संघर्ष सुरु होईल असं वाटत नाही. पण त्यांनी इशारा दिलाय की, तेहरानने हल्ले केले, तर अमेरिका दहापट जास्त जोरात प्रत्युत्तर देईल. हे पुन्हा सुरु होईल, असं मला वाटत नाही. पण त्यांनी हल्ला केलाच तर आम्ही दहापट जास्त जोरात प्रत्युत्तर देऊ. जे काही सुरु होईल ते लवकर संपेल” असं ट्रम्प म्हणाले. “आम्ही जे काही करु ते सुरक्षित बनवू. तेलाचा पुरवठा विनाअडथळ सहज सुरु राहिल” असं ट्रम्प म्हणाले.

हॉर्मुज स्ट्रेटमध्ये मंगळवारी तीन व्यापारी जहाजांवर हल्ले झाले. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने इराणमधील जवळपास 80 सैन्य तळांवर हल्ला चढवला. त्यानंतर ट्रम्प यांनी सीजफायर संपल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे जगातील अनेक देशांचे धाबे दणाणले. कारण इराण हॉर्मुज स्ट्रेटमध्ये जल वाहतूक रोखून जगभरात तेल कोंडी निर्माण करु शकतो. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ वर पोस्ट करुन त्यात लिहिलं की, “हा फक्त जहाजांवरील हल्ल्याचा बदला आहे. पुन्हा असं झाल्यास परिस्थिती खराब होईल” हॉर्मुज स्ट्रेट मधून जाणाऱ्या जहाजांवरील इराणची हल्ला करण्याची क्षमता कमी करणं हा अमेरिकेचा इराणवरील हल्ल्यामागचा उद्देश होता.

अमेरिकन सेंट्रल कमांडचा ऑपरेशनमागचा उद्देश काय?

हल्ला करावा लागला यासाठी अमेरिकेने इराणला जबाबदार धरलं. हॉर्मुज स्ट्रेट जगातील एक व्यस्त तेल मार्ग आहे. त्याच्या सुरक्षेसाठी हे ऑपरेशन आवश्यक होतं असं अमेरिकेने म्हटलं आहे. समुद्रातील व्यापारी जहाजांचं स्वातंत्र्य कायम ठेवणं हा अमेरिकन सेंट्रल कमांडच्या ऑपरेशनमागचा उद्देश आहे. जगातील जवळपास 20 टक्के तेल वाहतूक या मार्गावरुन होते. इराणकडून व्यापारी जहाजांवर हल्ले करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय.

 

Follow Us