AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धाड धाड जाणार भारतीय लोकांच्या नोकऱ्या, अमेरिकेचा H-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय, थेट दिग्गज भारतीय आयटी कंपनीवर..

पुन्हा एकदा अमेरिकेत नोकऱ्या करणाऱ्या भारतीय लोकांच्या नोकऱ्या संकटात आल्या. H-1B व्हिसाबाबत थेट मोठे अभियान अमरिकेत सुरू करण्यात आले. यामध्ये काही भारतीय आयटी कंपन्यां टार्गेटवर आहेत.

धाड धाड जाणार भारतीय लोकांच्या नोकऱ्या, अमेरिकेचा H-1B व्हिसाबाबत मोठा निर्णय, थेट दिग्गज भारतीय आयटी कंपनीवर..
H-1b visa and Donald Trump
| Updated on: Jul 09, 2026 | 9:01 AM
Share

अमेरिकेने इराणवर मोठा हल्ला केला. ज्याने एकच खळबळ उडाली. भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठा हल्ला अमेरिकेने केला. त्यानंतर आता मोठा दणका H-1B व्हिसाधारकांना अमेरिकेने दिला. H-1B व्हिसाच्या फसवणुकीच्या प्रकरणात मोठा निर्णय घेतला. थेट अभियानाला सुरूवात केली. अमेरिकेच्या एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले की, फसवणुकीच्या प्रकरणात भारतीय आयटी कंपनी कॉग्रिजेंटसोबतच काही बड्या मोठ्या कंपन्या सहभागी आहेत. व्हिसा संदर्भातील फसवणुकीच्या मुद्द्यात अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्या मार्गदर्शनाखाली टास्ट फोर्स टू एलिमिनेट फ्रॉडच्या माध्यमातून हे पाऊस उचलण्यात आले. श्रम विभागात काम करणाऱ्या ऑफिस ऑफ द इंस्पेक्टर जनरलने या सर्व फसवणुकीचा पर्दाफाश केला. खूप लोकांनी H-1B व्हिसासाठी खोटे अर्ज केली आहेत. विदेशी कामगारांचे शोषण करण्यात आले. अत्यंत कमी पगारात त्यांच्याकडून काम करून घेतले जात आहे.

कमी पैशात विदेशी लोकांना अमेरिकेत आणून काम करून घेतले जात आहे. ज्यामुळे पैशांची बचत होते पण यामुळे अमेरिकन लोकांना काम मिळत नाही. यादरम्यान श्रम विभागाचे इंस्पेक्टर जनरल एंथोनी डी एक्सोसिटो यांनी या कारवाईवर बोलताना मोठी माहिती दिली. त्यांनी म्हटले की, या प्रकरणात आम्ही अनेक समन जारी केले. आम्हाला याच्या मुळापर्यंत जायचे आहे.

आयटीमधील दिग्गज कंपनी कॉग्रिजेंटचे नाव घेत त्यांनी म्हटले की, आमच्यावर काही मोठ्या कंपन्यांच्या माहिती आहेत. या कंपन्या यापूर्वीही H-1B व्हिसाच्या मुद्द्यात चर्चेत होत्या. त्यांनी स्पष्ट केले की, या अभियानाचा मुख्य उद्देश आहे की, भ्रष्ट लोक पुढे आली पाहिजे. अमेरिकेने सुरू केलेल्या या अभियानामुळे लाखोच्या घरात अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात.

त्यांना भारतात परत पाठवले जाऊ शकते. भारतीय कंपन्यांना आता थेट टार्गेट केले जातंय. अमेरिकेच्या नागरिकांच्या हक्काच्या नोकरी काढून घेतल्यात जात असल्याचेही त्यांनी म्हटले. अमेरिकन सरकारने सुरू केलेल्या या अभियानामुळे भारतीय लोकांच्या नोकऱ्या या धोक्यात आल्यात. पुन्हा एकदा H-1B व्हिसाधारकांवर संकट आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक