टॅरिफमुळे डोनाल्ड ट्रम्प संकटात, ‘या’ 2 देशांनी दिला दणका, भारतासमोर काय पर्याय?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसात जगातील बऱ्याच देशांवर कर लादला आहे. टॅरिफमुळे त्यांचा लढाऊ विमानांचा करार अडचणीत आला आहे. F-35 बनवणारी कंपनी लॉकहीड मार्टिन संकटात सापडली आहे.

टॅरिफमुळे डोनाल्ड ट्रम्प संकटात, या 2 देशांनी दिला दणका, भारतासमोर काय पर्याय?
Trump Donald
| Updated on: Aug 09, 2025 | 9:19 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसात जगातील बऱ्याच देशांवर कर लादला आहे. यामुळे भारतासह बऱ्याच देशांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता या करामुळे अमेरिका संकटात सापडली आहे. टॅरिफमुळे त्यांचा लढाऊ विमानांचा करार अडचणीत आला आहे. F-35 बनवणारी कंपनी लॉकहीड मार्टिन संकटात सापडली आहे. कारण स्पेनने F-35 लढाऊ विमान खरेदी करण्यास नकार दिला आहे. तसेच स्वित्झर्लंड F-35 खरेदी करण्यास नकार देण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर भारतानेही अमेरिकन शस्त्रे खरेदी नकार दिला आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांची अडचण वाढली आहे.

स्पेनचा निर्णय काय?

स्पेनने F-35 लढाऊ विमान खरेदी करण्यास नकार दिला आहे. आता हा देश युरोपियन जेट युरोफायटर टायफून आणि फ्युचर कॉम्बॅट एअर सिस्टम (FCAS) खरेदी करणार असल्याचे समोर आले आहे. स्पेनच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले की, आमचे लक्ष आता एअरबस, BAE सिस्टम्स आणि लिओनार्डो सारख्या युरोपियन कंपन्यांवर आहे. स्पेनच्या या भूमिकेमागे महत्वाचे कारण आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्यावर नाटो खर्च 5 टक्के वाढवण्यासाठी दबाव टाकला होता. तसेच ट्रम्प यांनी टॅरिफची धमकीही दिली होती, त्यामुळे आता स्पेनने अमेरिकेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

स्वित्झर्लंडने काय म्हटले?

डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वित्झर्लंडवरही टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. अमेरिकेने स्वित्झर्लंडवर 39 टक्के टॅरिफ लादला आहे. त्यामुळे देशातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. खासदार बाल्थासर ग्लॅटली यांनी, जो देश आपल्यावर दगडफेक करतो, त्याला आपण भेटवस्तू नाही देऊ शकत. त्यानंतर त्यांनी एफ-35 लढाऊ विमान करार रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

भारताची भूमिका काय?

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदी केल्यामुळे भारतावर 50 टक्के टॅरिफ लावले आहे. त्यामुळे भारताने अमेरिकेकडून शस्त्रे खरेदी करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. आता भारताने तेजस आणि इतर पर्यायांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. भारत अमेरिकेपासून दूर राहिला तर रशियन एसयू-57 लढाऊ विमान खरेदीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या तिन्ही प्रमुख देशांच्या निर्णयांमुळे अनेरिकेला फटका बसण्याची शक्यता आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us