आम्ही युद्ध जिंकलो… डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, डान्स करत थेट म्हणाले, काही तासातच…
अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका अनेक देशांना बसत असून मोठे संकट उभे आहेत. त्यामध्येच आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

इराण आणि अमेरिका युद्ध भडकले आहे. इस्त्रायल, अमेरिका आणि इराणपर्यंत हे युद्ध आता राहिले नसून या युद्धात अनेक देश भरडले जात आहेत. अमेरिका आणि इस्त्रायलने ज्याचा विचारही केला नाही असे हल्ले इराणकडून केले जात आहेत. अमेरिकेला आणि इराणला या युद्धात सळो की पळे इराणने केले. यासोबतच होर्मुज समुद्रीमार्ग इराणकडून बंद करण्यात आला. जे देश या युद्धापासून दूर राहण्याची भाषा करत होते, त्यांच्यावरही संकट कोसळले आहे. पाकिस्तानमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. ना त्यांच्याकडे गॅस आहे ना त्यांच्याकडे कच्चे तेल. भारतात देखील एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. बांगलादेशमध्येही पाकिस्तानसारखी स्थिती आहे. आखाती देशांवर आभाळातून संकट कोसळत आहे आणि खाण्यापिण्याचेही मोठे वांदे झालेत. भारतातून मोठ्या प्रमाणात फळे आणि भाज्या आखाती देशात निर्यात होतात, इराणकडून महत्वाचा मार्ग बंद करण्यात आल्याने आयात आणि निर्यात पूर्णपणे बंद आहे.
28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेकडून मोठा हल्ला इराणवर करण्यात आला. त्यानंतर इराणने थेट ज्या ज्या देशांमध्ये अमेरिकेचे लष्कर तळ आहेत, त्या देशांमध्ये हल्ले केले. यावेळी अनेक तेल रिफायनरीलाही इराणकडून थेट टार्गेट करण्यात आले. ज्यानंतर आखाती देशांना मोठा झटका बसला. अमेरिका देखील आखाती देशांचे संरक्षण करू शकली नाही.
अमेरिकेने आणि इस्त्रायलने केलेल्या 28 तारखेच्या हल्ल्यात इराणचे सर्वाेच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई ठार झाले. या हल्ल्यात खामेनेई यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य मारले गेले. त्यावेळी इराणला मोठा झटका बसला. आता इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा दावा केला. त्यांनी म्हटले की, इराणसोबतचे युद्ध आम्ही सुरूवातीच्या काही तासाच जिंकलो होतो.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेने इराणसोबतच युद्ध काही तासाच जिंकले. आता फक्त अमेरिकेची सेना हे ऑपरेशन सुरू ठेवत आहे. केंटकीतील हेब्रॉन येथे एका रॅलीला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकन सैन्याने आधीच विजय मिळवला आहे, परंतु वॉशिंग्टन अकाली माघार घेणार नाही. खूप लवकर जिंकलो असे म्हणणे आवडत नाही.. पण आम्ही जिंकले आहे… पहिल्या तासातच सर्व काही संपले होते, यावेळी डोनाल्ड ट्रम्प चक्क स्टेजवर डान्स करतानाही दिसले.