AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…

पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील अमेरिका आणि इराण यांच्यातील बैठक निष्फळ ठरली. या बैठकीतून कोणताही समाधानकारक पर्याय समोर न आल्याने आता डोनाल्ड ट्रम्प आक्रमक झाले आहेत. त्यांनी जगाला गंभीर आणि मोठा इशारा दिला आहे.

तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता...
donald trump and strait of hormuzImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2026 | 11:35 PM
Share

Strait Of Hormuz : पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे इराण आणि अमेरिका यांच्यात बैठक पार पडली. दोन्ही देशांमध्ये 14 दिवसांच्या युद्धविरामानंतर हे युद्ध कायमचे संपवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करावी, अशी अमेरिकेची मागणी होती. परंतु या मागणीवर समाधानकारक तोडगा निघू शकला नाही. ही बैठक निष्फळ ठरली. या बैठकीनंतर मात्र आता इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध पुन्हा भडकण्याची भीती निर्माण झाली आहे. याच युद्धभडक्याचा पहिला अंक म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा आदेश दिला आहे. या आदेशामुळे आता भरतापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणते फर्मान सोडले आहे?

इस्लामाबादच्या बैठकीत कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने आता डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला मोठा इशारा दिला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाताना कोणत्याही देशाने इराणला टोल दिला तर आम्ही त्या देशाच्या जहाजाला तिथेच जलसमाधी देऊ, असा इशाराच ट्रम्प यांनी दिला आहे. त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदीला सुरुवात केली आहे. ट्रम्प यांनी सोशल ट्रुथ या सोशल मीडियावर एक पोस्ट करून याविषयी माहिती दिली.

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले?

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्त्वात इस्लामाबादमध्ये 20 तास बैठक झाली. या बैठकीत चांगली चर्चा झाली. परंतु इराणने जे आश्वासन दिले होते, ते पाळले नाही. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली केलेली नाही. त्यामुळे आता अमेरिकेची नौसेना होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदी करत आहे. समुद्रात माईन्स आहेत, असं इराणकडून सांगितलं जातंय. परंतु असे सांगून इराणकडून ब्लॅकमेल केले जात आहे. इराणला कोणीही अवैध टोल दिला तर त्या जहाजाला समुद्रात सुरक्षित मार्ग दिला जाणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

भारतापुढे नेमकी अडचण काय?

दरम्यान, भारत आणि इराण यांच्यातील संबंध हे मैत्रीपूर्ण आहेत. या युद्धात इराणने भारताच्या तेलवाहू, नैसर्गिक वायूची वाहतूक करणाऱ्या जहाजांना मार्ग दिलेला आहे. परंतु आता इराणला कोणी टोल दिला तर आम्ही त्या जहाजाला मार्ग देणार नाही, या अमेरिकेच्या भूमिकेमुळे भारताची पंचाईत झाली आहे. त्यामुळे यातून भारत नेमका कसा मार्ग काढणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?