पीओकेमध्ये झालेल्या राड्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांची उडाली झोप

पाकिव्याप्त काश्मीरमध्ये सुरु असलेल्या आंदोलनामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांची झोप उडाली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये वेगवेगळ्या मागण्यांसाठी लोकं रस्त्यावर उतरले आहेत. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक घटनेमुळे पाकिस्तानचे पंतप्रधानांनी आंदोलकांना इशारा तर दिला आहे.

पीओकेमध्ये झालेल्या राड्यामुळे पाकिस्तानच्या पंतप्रधानांची उडाली झोप
Follow us
| Updated on: May 13, 2024 | 6:48 PM

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये सोमवारी चौथ्या दिवशीही आंदोलन सुरू असल्याने संपूर्ण भागात तणावपूर्ण वातावरण आहे. या दरम्यानच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी मोठा निर्णय घेतलाय. पीओकेसाठी 23 अब्ज रुपयांचा तात्काळ निधी मंजूर केला आहे. पीओकेमध्ये निदर्शन होत असल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचं टेन्शन वाढलं आहे. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती. कायदा हातात घेतल्यास खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी रविवारी दिला होता. शाहबाज म्हणाले की, मी पीओकेचे पंतप्रधान चौधरी अन्वारुल हक यांच्याशी बोललो आहे. ते म्हणाले, ‘मी सर्व पक्षांना त्यांच्या मागण्या सोडवण्यासाठी शांततापूर्ण मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करतो. प्रकरण लवकरच निकाली निघेल, अशी अपेक्षा आहे.

सुरक्षा दल आणि आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर पाकिस्तान सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न तीव्र केले आहेत. शनिवारी वादग्रस्त भागात पोलीस आणि अधिकार कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली, ज्यामध्ये एक पोलिस अधिकारी ठार झाला आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले. जखमींमध्ये बहुतांश पोलिसांचा समावेश आहे. या आंदोलनीमुळे येथील जनजीवन ठप्प झाले आहे. आंदोलक आणि राज्य सरकार यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी आज सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.

जम्मू आणि काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JAAC) चे सदस्य या प्रदेशातील जलविद्युत निर्मितीच्या खर्चानुसार विजेच्या किमती निश्चित कराव्यात, गव्हाच्या पिठावरील सबसिडी बंद केल्याने आणि उच्चभ्रू वर्गाचे विशेषाधिकार बंद करा अशी मागणी करत आहेत. JAAC च्या नेतृत्वाखाली पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथे लाँग मार्च काढण्यात आला. JAAC कोअर कमिटी आणि क्षेत्राचे मुख्य सचिव दाऊद बरच यांच्यातील चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने आंदोलकांनी मुझफ्फराबादकडे मोर्चा काढण्याची घोषणा केली. रावळकोटच्या आंदोलक नेत्याने सरकारवर टाळाटाळ करण्याचे धोरण अवलंबल्याचा आरोप केला.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनमध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार आंदोलकांनी मुझफ्फराबाद रस्ता रोखून धरला होता. चौकाचौकात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे. बाजारपेठा, व्यापारी केंद्रे आणि शैक्षणिक संस्था सध्या बंद आहेत. वाहतूक सेवा ठप्प आहे. मीरपूरमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक सुरू झाल्यानंतर सरकारने तेथे रेंजर्सचे पाचारण केले होते. आपल्या मागण्यांसाठी आंदोलक ठाम आहे. पुंछ-कोटली रस्त्यावरअनेक वाहनांचे आंदोलकांनी नुकसान केले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.