
इराण आणि इस्रायलमध्ये आता युद्ध सुरू झालं आहे. दोन्ही देश एकमेकांच्या मागे हात धुवून लागले आहेत. इराणने मंगळवारी रात्री उशिरा इस्रायलवर 200 हून अधिक मिसालईलचा मारा केला. इस्रायलच्या सैन्य तळांवरच मुख्यत्वे हा मारा करण्यात आला होता. त्यामुळे इस्रायलमध्ये एकच हल्लकल्लोळ उडाला आहे. सर्व लोक झोपेत असताना झालेल्या या हल्ल्याने आजची सकाळ इस्रायलसाठी शॉकिंग ठरली आहे. इराणने बदला घेण्यासाठी हा हल्ला केला. तर तिकडे इस्रायलनेही बदला घेण्याचा इशारा दिला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इराणच्या हल्ल्याला जशास तसे उत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे. आम्ही जशास तसे उत्तर देऊ. पण ते कधी द्यायचं हे आम्हीच ठरवू, असं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. इस्रायल आणि इराणच्या या वादाने मध्य पूर्वेत महायुद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय घडलं? मंगळवारी रात्री इरानने इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाइलचा मारा केला. तेल अवीवमध्ये 200 हून अधिक मिसाइल डागले गेले. त्यामुळे...