
एपस्टीन फाइल्स प्रसिद्ध झाल्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. यातून अनेक फोटो समोर आले आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या या फाईल्समुळे अनेकांची अडचण वाढली आहे. या फोटोंमध्ये जेफ्री एपस्टीनच्या ‘लोलिता एक्सप्रेस’ या प्रायव्हेट जेटच्या फोटोंचाही समावेश आहे. त्यामुळे या जेटचीही चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे येटबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. या जेटमधून मुलींना खाजगी बेटावर नेण्यात आले होते जिथे त्यांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे. एपस्टीनच्या विमानाला ‘लोलिता एक्सप्रेस’का म्हटले जायचे याबाबत माहिती जाणून घेऊयात.
एपस्टीन यांच्या खाजगी बोईंग 727 जेटचे नाव लोलिता एक्सप्रेस असे होते. याद्वारे ते न्यू यॉर्क, फ्लोरिडा, कॅरिबियनमधील खाजगी बेट आणि इतर देशांदरम्यान प्रवास करत असतं. आता या विमानाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फ्लाइट लॉग आणि साक्षीदारांनी दावा केला आहे की एपस्टीन हे या जेटमधून अल्पवयीन मुली आणि तरुणींना न्यायचे. नंतर या तरुणींचे शोषण केले जात होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकणात या जेटचा मोठा हात होता.
या जेटमधून मुलांना सिक्रेट ठिकाणी नेले जात होते. या प्रकरणाची कुणकुण अमेरिकन मीडियाला लागल्यानंतर यासाठी विमानासाठी लोलिता एक्स्प्रेस हा शब्द वापरला जाऊ लागला. हे या जेटचे अधिकृत नाव नव्हते, हे एक व्यंग्यात्मक टोपणनाव होते. याचा अर्थ अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणासाठी वापरले जाणारे विमान. या विमानाचे नाव जगभरात अल्पावधित पसरले होते. या विमानातून नेल्या जाणाऱ्या मुली या बडे उद्योगपती, नेते, सेलिब्रिटी आणि इतर लोकांना पुरवल्या जात होते. या मुलींचे लैंगिक शोषण केले जात होते.
लोलिता ही रशियन अमेरिकन लेखक व्लादिमीर नाबोकोव्ह यांची कादंबरी आहे. यात हम्बर्ट नावाचा एक व्यक्ती 12 वर्षांच्या मुलीवर, डोलोरेस हेझकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होतो. तो तिला प्रेमाने लोलिता असे टोपणनाव देतो आणि त्यानंतर वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार करतो. पॉप संस्कृतीत, लोलिता हा शब्द लैंगिकदृष्ट्या आकर्षक अल्पवयीन मुलीसाठी वापरला जात होता.