AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : ट्रम्प यांच्या नाराजीचं सर्वात मोठं कारण आलं समोर… भारत अनेक देशांकडून ही गोष्ट खरेदी करतो, पण…

अमेरिकेने भारतावर 50 % कर लादला आहे. डोनाल्ड ट्रम्प भारतावर नाराज असल्याने त्यांनी ही कारवाई केली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाराजीचे महत्त्वाचे कारण समोर आले आहे.

Explainer : ट्रम्प यांच्या नाराजीचं सर्वात मोठं कारण आलं समोर... भारत अनेक देशांकडून ही गोष्ट खरेदी करतो, पण...
MODI-TRUMP
| Updated on: Sep 15, 2025 | 4:55 PM
Share

अमेरिकेने भारतावर 50 % कर लादला आहे. यामागे डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक कारणे सांगितली आहेत. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे हे त्यातील एक प्रमुख कारण आहे. अलिकडेच अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांनी म्हटले होते की, ‘भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे, पण ते आपल्याकडून एकही पोतं मका खरेदी करत नाही. जर भारत मका खरेदी करत नसेल तर त्यांना शुल्काचा सामना करावा लागेल. अमेरिकन मंत्र्यांच्या या विधानानंतर हेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारतावरील नाराजीचे प्रमुख कारण असल्याचे बोलले जात आहे. तसेच भारत अमेरिकेकडून मका का खरेदी करत नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारतात मकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे भारत दुसऱ्या देशांना मका निर्यात करत असे. मात्र देशात इथेनॉलचे उत्पन्न सुरु झाल्यापासून मकाची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे सरकारने मका आयात करण्यास सुरुवात केली आहे. भारत सध्या बऱ्याच देशांकडून मका आयात करत आहे. मात्र भारत अमेरिकेतून मका आयात करत नाहीत, त्यामुळे ट्रम्प यावर संतापले आहेत. भारत इतर देशांकडून मका खरेदी करू शकतो, तर आपल्याकडून का नाही? असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे.

भारतात मकाचे किती उत्पादन होते?

मकाच्या उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात सहाव्या स्थानावर आहे. भारतात मका खाण्याव्यतिरिक्त पशुखाद्य, इथेनॉल उत्पादन आणि कुक्कुटपालनासाठी केला जातो. उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये मकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या देशात सुमारे 4 कोटी टन मकाचे उत्पादन होते. 2047 पर्यंत ते 8.6 कोटी टनांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे.

भारत या देशांकडून मका खरेदी करतो

इथेनॉल तयार करण्यासाठी भारताला मका आयात करावी लागत आहे. वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये भारताने म्यानमारकडून 1 ते 2 लाख टन मका खरेदी केली. तसेच जानेवारी-ऑगस्ट 2025 मध्ये भारताने युक्रेनकडून सुमारे 4 लाख टन मका खरेदी केली. तसेच थायलंड, अर्जेंटिना या देशांकडूनही भारताने मका खरेदी केला आहे. मात्र भारताने या काळात अमेरिकेकडून मका खरेदी केलेली नाही.

भारत अमेरिकेकडून मका का खरेदी करत नाही?

  • अमेरिकेत पिकणारी मका भारतासाठी धोकाकायक – अमेरिकेकडून मका खरेदी न करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तेथील मका संकरित आहे. भारतात ही मका खाण्यासाठी किंवा प्राण्यांसाठी वापरण्यावर बंदी आहे.
  • कर आणि किंमत – अमेरिकेकडून मका खरेदी न करण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, अमेरिकन मका वर 50 टक्के कर आहे. त्याऐवजी भारत युक्रेन आणि म्यानमारमधून करमुक्त मका खरेदी करतो. तसेच अमेरिकेतून मका आयात करण्याचा खर्च देखील जास्त आहे.
  • मागणी आणि पुरवठ्यातील तफावत – भारताला लागणारी सर्व मका आपल्या देशातच उत्पादित केली जाते. थोडीफार लागणारी मका कर नसणाऱ्या देशांकडून खरेदी केली जाते. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात तफावत आहे.
  • शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण – भारत देशांतर्गत शेतकऱ्यांना प्राधान्य देतो, शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भारत अमेरिकन मका खरेदी करत नाही.
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या