भारतावर टॅरिफ पण अमेरिकेत महागाई गगनाला, नोकऱ्यांवर गदा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाच्या विरोधात थेट..

America Tariff : विविध कारणे सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. दरवेळी भारतावर टॅरिफ लावण्याचे त्यांनी वेगळे कारण सांगितले. मात्र, भारतापेक्षा अधिक परिणाम अमेरिकेत या टॅरिफचा दिसतोय. डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय फसल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे.

भारतावर टॅरिफ पण अमेरिकेत महागाई गगनाला, नोकऱ्यांवर गदा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाच्या विरोधात थेट..
Donald Trump
| Updated on: Sep 18, 2025 | 1:13 PM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला. फक्त भारतच नाही तर ते इतरही काही देशांना टॅरिफच्या मुद्द्यावरून धमकावताना दिसत आहेत. जगभरातील तज्ज्ञांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयावर टीका केली. भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर डोनाल्ड ट्रम्प हे चांगलेच कोडींत सापडले.  एकीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंद केलेला संवाद वाढवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे भारताच्या मागे कुरघोड्या करताना देखील दिसत आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तानला हाताशी धरून मोठा कट रचण्याचा त्यांचा डाव आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांना घरातूनच मोठा आहेर मिळालाय. हेच नाही तर भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफनंतर अमेरिकेत महागाई वाढल्याने त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

टॅरिफच्या मुद्द्यावरून अमेरिकन माजी अधिकारी आणि माजी मंत्री ट्रम्प यांना टार्गेट करताना दिसले. अमेरिकेतील इतर आर्थिक समस्यांना देखील टॅरिफच कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांनीही अमेरिकेतील सध्याच्या परिस्थितीला टॅरिफ कारणीभूत असल्याचा आरोप केला. नोकऱ्यांवर मंदी आहे आणि अनेकांच्या नोकऱ्या देखील गेल्याचे त्यांनी म्हटले. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी म्हटले की, नोकरी वाढीचा वेग मंदावला आहे. नोकऱ्यांवरील धोका वाढलाय.

महागाई गगनाला पोहोचली, कमी होण्याचे नाव घेत नाहीये. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत जीडीपी सुमारे 1.5% दराने वाढला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत  2.5% पेक्षा कमी आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला टॅरिफचा निर्णय हा त्यांच्यावरच उलट पडताना दिसत आहे. सगळ्या बाजूंनी त्यांच्यावर आरोप केली जात आहेत. त्यांना घेरण्याचे काम सुरू आहे. भारतावर लावलेल्या टॅरिफचा परिणाम अमेरिकेत स्पष्ट दिसत असून भारतातून होणारी 70 टक्के निर्णयात बंद झाली.

भारतातून जाणाऱ्या प्रत्येक वस्तूवर इतका मोठा टॅरिफ लावला की, मिळणारे उत्पन्न अत्यंत कमी झाल्याने भारतातील व्यापाऱ्यांनी अमेरिकेत होणारी निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर अनेक देश हे भारताच्या मदतीला धावून आल्याचे चित्र असून भारताच्या वस्तूंसाठी आपली बाजारपेठेत मोकळी केलीये. रशियाने तर थेट म्हटले की, आमच्या बाजारपेठेत भारतीय वस्तूंचे स्वागत आहे.