अखेर भारताच्या Covaxin ला WHO ची मान्यता

WHO द्वारे प्रमाणित केलेल्या लसींच्या पोर्टफोलिओमध्ये Covaxin सामील केले आहे," जागतिक आरोग्य संस्थेने ट्विटमध्ये म्हटले आहे. कोवॅक्सिनने काविड-19 च्या लक्षणाविरोधात 77.8 टक्के परिणामकारक ठरली आणि नवीन डेल्टा वेरिएंटविरोधात 65.2 टक्के संरक्षण करायला परिणामकारक ठरली आहे.

अखेर भारताच्या Covaxin ला WHO ची मान्यता
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 7:36 PM

नवी दिल्लीः अखेर भारत बायोटेकच्या कोविड-19 लस कोवॅक्सिनला (Covaxin) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बुधवारी आपत्कालीन वापरासाठी (EUL) मंजुरी दिली. WHO च्या स्वतंत्र सल्लागार समितीच्या तांत्रिक सल्लागार गट (TAG) ने कोवॅक्सिनला EUL दर्जा देण्याची शिफारस केली होती. (Finnaly Covaxin of Bharat Biotech approved by WHO)

WHO ने (भारत बायोटेक द्वारे विकसित) #COVAXIN ला आपत्कालीन वापर म्हणून मंजूर दिली. कोविड-19 च्या प्रतिबंधासाठी WHO द्वारे प्रमाणित केलेल्या लसींच्या पोर्टफोलिओमध्ये सामील केले,” अशी माहिती जागतिक आरोग्य संस्थेने ट्विटमध्ये दिलीय. कोवॅक्सिन ही लस कोविड 19 च्या लक्षणाविरोधात 77.8 टक्के परिणामकारक ठरली आणि नवीन डेल्टा वेरिएंटविरोधात 65.2 टक्के संरक्षण करायला परिणामकारक ठरली आहे.

जूनमध्ये कंपनीने सांगितले की, त्यांनी फेज 3 चाचण्यांमधून कोवॅक्सिनच्या परिणामकारकतेचे अंतिम परीक्षण केले. भारत बायोटेकचे कोवॅक्सिन आणि अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे कोविशील्ड या भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या दोन लसी आहेत.

Related News

लसीकरण नसेल तर पगार नाही, प्रवेश नाही! नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे सरकारी कार्यालयांना आदेश

Covid Vaccination: 30 नोव्हेंबरपर्यंत राज्याचे 100 टक्के लसीकरण व्हावे, मुख्यमंत्र्यांचे आदेश; पंतप्रधानांसोबत बैठक