
रशिया आणि युक्रेन युद्ध भडकणार असून युक्रेनबद्दल जगातून संताप बघायला मिळत आहे. हेच नाही तर अमेरिकेने सुद्धा आता थेट युक्रेनवर टीका केली. युक्रेनच्या एका चुकीच्या जग युद्धामध्ये ढकलले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केली जात आहेत. मात्र, शांतता प्रस्तावावर चर्चा होत असतानाच युक्रेनने थेट 91 ड्रोन रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घरावर डागली आणि थेट पुतिन यांची झोपेतच हत्या करण्याचा कट रचला. या हल्ल्यामुळे जगात खळबळ उडाली असून जगाची झोप उडाली आहे. 91 युक्रेनी ड्रोन हल्ला रशियाने उधळून टाकला. मात्र, यामुळे आता रशिया चांगलाच खवळला असून याचे वाईट परिणाम युक्रेनला मोजावी लागतील, असे थेट रशियाने म्हटले असून हे युद्ध भडकणार हे स्पष्टच आहे.
रशिया युक्रेन युद्ध रोखण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतानाच युक्रेनने थेट संपातजनक कृत्य करून जगाचा रोष घेतला. 28-29 डिसेंबर 2o25 च्या रात्री, नोव्हगोरोदमधील पुतिन यांच्या निवासस्थानावर 91 ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. यादरम्यान रशियन हवाई संरक्षण दलाने सर्वच्या सर्व ड्रोन नष्ट केले. पुतिन यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे कळताच संपूर्ण जग हैराण झाले असून युक्रेनला हे युद्ध थांबवायचे नसल्याचा आरोप करण्यात आला.
या तणावाच्या परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना फोन केला. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिन यांना शांतता राखण्याचे आवाहन केले. मात्र, भडकलेल्या पुतिन यांनी चार गोष्टी थेट डोनाल्ड ट्रम्प यांनाच सुनावल्या. पुतिन यांनी ट्रम्प यांना स्पष्ट शब्दात सांगितले की, जेव्हा घरांवर हल्ले होत आहेत, तेव्हा शांततेबद्दल बोलणे निरर्थक आहे. हेच नाही तर त्यांनी म्हटले की, आता कीवला मोठी किंमत चुकवावी लागेल.
पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नामुळे डोनाल्ड ट्रम्प देखील संतापले आहेत. ट्रम्प यांनी या हल्ल्याचे वर्णन पागलपणाचे कृत्य केले. ट्रम्प यांनी म्हटले की, अशा कृतीची मी साधी कल्पनाही करू शकत नाही. हेच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यासोबत काम करण्याच्या गोष्टीवर पुनर्विचार केला जाईल, असेही सांगितले. पुतिन यांनी ट्रम्पला म्हटले की, युक्रेनला शांतता हवी नाहीये.