पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ व्हेंटिलेटरवर, दीर्घ आजारानंतर दुबईत निर्णय

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्र्फ यांना दुबईत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.  मुशर्रफ यांची गेल्या अनेक काळापासून तब्येत खराब होती. त्यांना गंभीर परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ व्हेंटिलेटरवर, दीर्घ आजारानंतर दुबईत निर्णय
Musshraf on ventilatorImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 5:59 PM

नवी दिल्ली पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्र्फ यांना दुबईत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.  मुशर्रफ यांची गेल्या अनेक काळापासून तब्येत खराब होती. त्यांना गंभीर परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.  त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. मुशर्रफ ७८ वर्षांचे आहेत. 

२००१ ते २००८ या कालखंडात ते पाकिस्तानचे राष्ट्रपती होते. त्यापूर्वी ते पाकिस्तानी लष्कराचे प्रमुखही होते. कारगील युद्धाला परवेझ मुशर्रफ हेच जबाबदार होते, असा आरोप अनेकदा त्यांच्यावर करण्यात आला. त्यांनी नवाज शरीफ यांना सत्तेतून पायउतारही केले होते. १९९९ साली पाकिस्तानचे लष्करप्रमुख असताना पाकि्स्तानी सैन्याला भारताकडून पराभव व्हावे लागले होते. यावरुन तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर १२ ऑक्टोबर १९९९ साली नवाझ शरीफ यांनी मुशर्रफ यांना लष्करप्रमुखपदावरुन पदच्युत केले होते. हे वृत्त कळताच मुशर्रफ यांनी शरीफ यांच्याविरोधात लष्करी बंड केले आणि सत्ता ताब्यात घेतली. १५ ऑक्टोबर १९९९ रोजी मुशर्रफ यांनी पाकिस्तानात आणीबाणी लागू केली होती. त्यानंतर त्यांनी स्वताला राष्ट्रपती म्हणून जाहीर कले. नवाज शरीफ यांना अटकेत टाकले आणि त्यांना देश सोडण्यास भाग पाडले.

२००१ साली विवादीत जनमताच्या आधाराने ते पाकिस्तानचे राष्ट्रपती झाले. २००७ सालापर्यंत त्यांच्याविरोधात जनमत तयार झाले होते. डिसेंबर २००७ मध्ये बेनझीर भुट्टो यांची हत्या झाल्यानंतर, १८ ऑगस्ट २००८ रोजी मुशर्रफ यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि लंडनला पलायन केले होते. पुढे ४ वर्षे लंडनमध्ये राहून ते पुन्हा पाकिस्तानात परतले होते. तालिबानने मुशर्रफ यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. पाकिस्तानात परतल्यानंतर त्यांच्याविरोधात देशद्रोह आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर हा खटलाही चालला.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.