डोनाल्ड ट्रम्प पडले तोंडावर, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची भाषा ओसामा बिन लादेनसारखी, अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याची थेट मोठी मागणी

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल जो टॅरिफचा निर्णय घेतलाय. त्याला भारताकडून विरोध केला जातोय. भारत काहीही झाले तरीही अमेरिकेच्या अटी मान्य करणार नसल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यादरम्यानच पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाने अमेरिकेतच्या धरतीवरून हैराण करणारे विधान केले.

डोनाल्ड ट्रम्प पडले तोंडावर, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची भाषा ओसामा बिन लादेनसारखी, अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याची थेट मोठी मागणी
donald trump and Pakistan Army Chief General Asim Munir
| Updated on: Aug 12, 2025 | 9:03 AM

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी अमेरिकेतून थेट गरळ ओकली. यासोबतच थेट अणुहल्ल्याबाबत त्यांनी धक्कादायक विधान केले. हेच नाही तर त्यांनी म्हटले की, आम्ही जर डुबत असतोल तर अर्ध्या जगालासोबत घेऊन जाऊ. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाने असे धक्कादायक विधान केल्याने खळबळ उडाली. यापेक्षाही धक्का देणारी बाब म्हणजे असीम मुनीर यांनी हे विधान अमेरिकेतून केले आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान. टॅरिफवरून भारतावर दबाव अमेरिकेतून असताना हे विधान म्हणजे मोठे संकेत देते. फक्त भारतच नाही तर आता पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या या विधानावर अमेरिकेतूनही टीका होतंय.

माजी अमेरिकन पेंटागॉन अधिकारी मायकेल रुबिन यांनी यावर भाष्य करत थेट म्हटले की, अमेरिकेच्या जमिनीवरून पाकिस्तानचे असे विधान अस्वीकार्य आहे. यासोबतच त्यांनी म्हटले की, लोकांच्या मनात प्रश्न येतोय की पाकिस्तान आता जबाबदार देश म्हणण्याच्या लायकीचा राहिला आहे असे म्हणणे योग्य आहे की त्याचा अंत होण्याची वेळ आली आहे. फक्त हेच नाही तर त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांची तुलना थेट ओसामा बिन लादेन याच्यासोबतच केलीये.

असीम मुनीरचे भाषण ऐकल्यावर थेट ओसामा बिन लादेनच्या भाषणाची आठवण करून देते. हेच नाही तर मायकेल रुबिन यांनी पुढे म्हटले की, मेजर नॉन-नाटो सहयोगी हा दर्जा देणे बंद केले पाहिजे. त्याला दहशतवादाच्या राज्य प्रायोजकांच्या यादीत टाकले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. मायकेल रुबिन यांनी अमेरिकेच्या जमिनीवरून अशाप्रकारची धमकी असीम मुनीर हे असा देऊ शकतो, असेही म्हटले. अमेरिकेच्या जनरलने त्यांना बैठकीच्या बाहेर का काढले नाही? असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.

ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि ज्या अमेरिकन जनरलने असीम मुनीरला भाषणानंतर बैठकीच्या बाहेर काढले नाही, त्यांनीही राजीनामे द्यावे, असे मायकेल रुबिन यांनी म्हटले. जोपर्यंत पाकिस्तान याबद्दल माफी मागत नाहीत, तोपर्यंत अमेरिकेत इतर कोणत्याही पाकिस्तानी अधिकाऱ्याला पर्सोना नॉन ग्राटा म्हणून घोषित केले पाहिजे. आता असीम मुनीरच्या भाषणानंतर पाकिस्तानवर जोरदार टीका केली जात आहे.