
फ्रान्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी एक झटका मानला जात आहे. फ्रान्स राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो यांनी सोमवारी फ्रान्स अधिकृतरित्या पॅलेस्टाइनला राष्ट्र म्हणून मान्यता देत असल्याच जाहीर केलं. हे पाऊल फ्रान्स आणि सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली आयोजित संयुक्त राष्ट्र सम्मेलनात उचलण्यात आलं. इस्रायल-पॅलेस्टाइनमधील वादावर टू-नेशन तोडग्याच जगातील अनेक देश समर्थन करत आहेत. संयुक्त राष्ट्र महासभेत हॉलमध्ये फ्रान्सिस राष्ट्रपती मॅक्रों यांनी ही घोषणा करताच उपस्थित 140 पेक्षा अधिक नेत्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. फ्रान्स पॅलेस्टाइनला देश म्हणून मान्यता देत असल्याच त्यांनी जाहीर केलं.
फ्रान्सने भले पॅलेस्टाइनला मान्यता दिली असेल, पण ग्राऊंड लेव्हलवर त्याचा काही परिणाम होईल असं वाटत नाही. कारण इस्रायलच गाझा पट्टीत आणखी एक आक्रमण सुरु आहे. गाझाच्या पश्चिमेकडे इस्रायल विस्तार करत आहे.
हा त्यांचा अधिकार आहे
मॅक्रों यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच पॅलेस्टाइनला देश म्हणून मान्यता देत असल्याची घोषणा केली. या सम्मेलनात जगातील अनेक देशाच्या नेते बोलतील अशी अपेक्षा होती. पॅलेस्टाइनचे राष्ट्रपती महमूद अब्बास हे व्हिडिओ कॉन्फ्रेंसच्या माध्यमातून बैठकीला संबोधित करतील अशी अपेक्षा आहे. संयुक्त राष्ट्र महासचिव एंटोनियो गुटेरेस म्हणाले की, पॅलेस्टाइनला एक देश म्हणून मान्यता हा त्यांचा अधिकार आहे. हे काही इनाम नाही.
आतापर्यंत किती देशांनी मान्यता दिलीय
ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि पोर्तुगाल या देशांनी रविवारी पॅलेस्टाइनला मान्यता दिली. पॅलेस्टाइनला अपेक्षा आहे की, येणाऱ्या दिवसात आणखी 10 देश असं पाऊल उचलतील. 193 सदस्य असलेल्या संयुक्त राष्ट्रात जवळपास तीन-चतुर्थांश देश पॅलेस्टाइनला मान्यता देतात. सध्या इस्रायलची पॅलेस्टाइन विरोधात आक्रमक कारवाई सुरु आहे. इस्रायलला संपूर्ण पॅलेस्टाइनलाच आपल्या ताब्यात घ्यायच आहे. पॅलेस्टाइन जनतेने फ्रान्सच्या या निर्णयाच स्वागत केलं आहे. एकदिवस आमचा स्वत:चा देश असेल अशा भावना पॅलेस्टाइन लोक व्यक्त करत आहेत. फ्रान्सचा हा निर्णय अमेरिकेतील सत्ताधारी डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायल यांच्यासाठी मोठा झटका आहे. हा ट्रम्प प्रशासनाचा पॅलेस्टाइनला मान्यता देण्यास विरोध आहे.