
गेल्या दोन दशकांत अमेरिकेने जगावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला आहे. 2003 ते 2026 या काळात रशियाशी दोस्ती करणाऱ्या 6 नेत्यांना अमेरिकेने संपवलं आहे. रशियाच्या जवळच्या नेत्यांची सरकारे एकामागून एक कोसळली आहेत. 2003 ते 2026 या कालावधीत अमेरिकेने थेट किंवा पडद्यामागून सुत्रे फिरवत या देशांमध्ये सत्ता परिवर्तन घडवले. या यादीत कोणत्या देशातील नेत्यांचा समावेश आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सद्दाम हुसेन हे सोव्हिएत युनियन आणि नंतर रशियाच्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक होते. 20 मार्च 2003 रोजी अमेरिका आणि ब्रिटनने ऑपरेशन इराकी फ्रीडम सुरू केले. इराकवर मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्रे बाळगल्याचा आरोप केला. 13 डिसेंबर 2003 रोजी त्यांना अटक करण्यात आली. 30 डिसेंबर 2006 रोजी त्यांना फाशी देण्यात आली.
शेवर्डनाडझे हे 1985 ते 1991 पर्यंत सोव्हिएत परराष्ट्र मंत्री होते आणि मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे जवळचे सहकारी होते. 1995 मध्ये ते जॉर्जियाचे अध्यक्ष झाले. निवडणुकीत हेराफेरीच्या आरोपांनंतर 23 नोव्हेंबर 2003 रोजी निदर्शकांनी संसदेवर हल्ला केला. शेवर्डनाडझे हे राजीनामा देऊन पळून गेले. यामागेही अमेरिकेचा हात होता.
यानुकोविच रशियाच्या जवळच्या मित्रांपैकी एक होते. नोव्हेंबर 2013 मध्ये, त्यांनी युरोपियन युनियन असोसिएशन करारावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. त्याऐवजी त्यांनी 15 अब्ज डॉलर्सची रशियन मदत स्वीकारली. त्यामुळे देशात निदर्शने झाली. त्यामुळे त्यांना रशियात पळून जावे लागले. यावेळी अमेरिकन सरकारने युक्रेनियन विरोधकांना लाखो डॉलर्सची मदत दिली.
आर्मेनिया हा रशियाचा पारंपारिक मित्र होता. आर्मेनियातील ग्युमरी येथे एक रशियन लष्करी तळ होता, जिथे 3000 हून अधिक सैन्य तैनात होते. सेर्झ सर्गस्यान 2008 पासून आर्मेनियामध्ये सत्तेत होते आणि ते रशियाच्या जवळचे मानले जात होते. 23 एप्रिल 2018 रोजी मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली. विरोधी पक्षनेते निकोल पशिन्यान यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.त्यामुळे सर्गस्यान यांना राजीनामा द्यावा लागला.
सीरिया हा रशियाचा सर्वात जुना आणि जवळचा मित्र होता.27 नोव्हेंबर 2024 रोजी, बंडखोरांनी अचानक हालेपवर हल्ला केला. त्यामुळे असदला सीरियातून रशियाला पळून जावे लागले. त्यानंतर अहमद अल-शारा सीरियाचे अध्यक्ष झाले. त्यांनी अमेरिकेशी वाटाघाटी सुरू केल्या. अमेरिकेने सीरियामध्ये सैन्य देखील पाठवले होते.
व्हेनेझुएला हा लॅटिन अमेरिकेतील रशियाचा सर्वात जवळचा मित्र होता. या देशाने रशियाकडून शस्त्रे खरेदी केली होती. मात्र अमेरिकेने ड्रग्स तस्करीचा आरोप कर मादुरो यांना ताब्यात घेतले. आता व्हेनेझुएलावर अनेरिकेचे नियंत्रण आहे.