सापांचा खेळ पाहायला गेला, पॅण्टीत घुसला कोब्रा,नंतर जे झाले त्याने…
सापांपासून दूर राहणेच चांगले असते, कारण साप विषारी असल्याने त्याच्या दंशानंतर माणूस मरण्याची शक्यता जास्त असते. अशाच प्रकारे एका व्यक्तीला सापांचा खेळ पहाणे महागात पडले आहे.

जर्मनीतील एक व्यक्ती तिच्या फॅमिलीसह इजिप्तच्या प्रसिद्ध रेड सी रिसॉर्ट हुरघाडा येथे फिरायला गेले होते. येथील हॉटेलातील सांपाचा चर्मिंग शो पाहताना या ५७ वर्षांच्या जर्मन व्यक्ती सोबत भयानक अपघात झाला. या शोच्या दरम्यान एक कोब्रा सांप त्यांच्या पॅण्टमध्ये शिरला आणि त्यांच्या पायाला चावला. त्यामुळे विष चढून या व्यक्तीचा मृत्यू झाला.
बवेरियन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबात तीन सदस्य Unterallgäu क्षेत्रातून हुरघाडा येथील एका लक्झरी बीच रिसॉर्टमध्ये उतरले होते. हॉटेलमध्ये एका मनोरंजना खेळाअंतर्गत सापांचा चर्मर शो सुरु होता. या खेळा दरम्यान दोन कोब्रांना प्रेक्षकांच्या गळ्यात घातले जात होते. सापांचा खेळ दाखवणाऱ्याने एका कोब्राला ५७ वर्षांच्या जर्मन पर्यटकाच्या पॅण्टमध्ये घुसायला दिले. साप आत जाताच त्या जर्मन व्यक्तीचा पायाला चावला. साप चावल्यानंतर या व्यक्तीत काही वेळाने विष भिनल्याची लक्षणे दिसू लागली. हॉस्पिटलमध्ये त्याला नेण्याचा प्रयत्न करुनही या जर्मन व्यक्तीचे प्राण वाचले नाहीत.
मोठा अपघात झाला
पोलिसाच्या अहवालात म्हटले आहे की शो दरम्यान त्या गारुड्याने जाणून बुजून सापाला त्या जर्मन व्यक्तीच्या पँटीत टाकले. दोन कोब्रा यावेळी वापरण्यात आले. घटनेनंतर जर्मनी पोलिसांनी याला दुजोरा दिला आणि कुटुंबाला सूचित केले. हुरघाडा हे इजिप्तचा लोकप्रिय टुरिस्ट स्पॉट आहे. येथे लक्झरी रिसॉर्ट्स, बीच आणि पाण्याचा खेळ पाहायला लोक जातात. स्नेक चर्मिंग शो अनेक हॉटेलत मनोरंजन म्हणून केला जातो. मात्र, यावेळी हा शो जीवघातक सिद्ध झाला आहे. तज्ज्ञांच्या मते कोब्रा अत्यंत विषारी साप मानला जातो. जर वेळीच एंटी वेनम दिले नाही तर मृ्त्यू होतो. या प्रकरणात लस उशीरा मिळाली किंवा जास्त विष भिनले असावे असे म्हटले जात आहे.
मनोरंजन झाले खतरनाक
इजिप्तमध्ये सर्पदंशाची अनेक प्रकरणे घडतात. मात्र,पर्यटन स्थळावर एका हॉटेलच्या शो दरम्यान घडलेला हा पहिलाच अपघात म्हटला जात आहे. जर्मनी पोलिसांनी या संदर्भात निवेदन जारी करीत कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेनंतर परदेश प्रवासात असा सापांच्या खेळात सहभागी होताना योग्य काळजी घ्यावी. खास करुन असा विषारी सर्पाच्या खेळात जास्त काळजी घेतली जाली. हुरघाडा येथील रिसॉर्टच्या मालकाने अजूनही या संदर्भात कोणतेही निवेदन जारी केलेले नाही.बवेरियन पोलिसांनी सांगितले की व्यक्तीचा मृत्यू साप चावल्याने झाला आहे. पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये विष शरीरात गेल्याची पृष्ठी मिळाली आहे. कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही.