Imran Khan:..तर पाकिस्तानचे तीन तुकडे करतील हिंदुस्तानी, इम्रान खानने दिला पाकिस्तानी जनेतला इशारा, अणुबॉम्बही हातातून जाण्याची वर्तवली शक्यता

| Updated on: Jun 02, 2022 | 8:31 PM

पाकिस्तान सध्या आत्महत्येच्या वाटेवर आहे, जर योग्य निर्णय झाले नाहीत, तर पहिला बळी सैन्यदलाचा जाईल, अशी शक्यताही इम्रान यांनी वर्तवली आहे. युक्रेनप्रमाणे पकिस्तानची अण्वस्त्रही जातील अशी भीतीही त्यांनी वर्तवली आहे.

Imran Khan:..तर पाकिस्तानचे तीन तुकडे करतील हिंदुस्तानी, इम्रान खानने दिला पाकिस्तानी जनेतला इशारा, अणुबॉम्बही हातातून जाण्याची वर्तवली शक्यता
इमरान खान
Image Credit source: tv9
Follow us on

इस्लामाबाद – जर पाकिस्तानी सैन्याने (Pakistan Army) योग्य निर्णय घेतला नाही, तर पाकिस्तानचे तीन तुकडे (three parts)होतील, असा इशारा माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan)यांनी दिला आहे. भारतातील थिंक टँक हा इतर देशांच्या मदतीने पाकिस्तानातील बलुचिस्तानची फाळणी करण्याची योजना आखत असल्याचा आरोप इम्रान यांनी केला आहे. भातातील थिक टँककडे याबाबतची योजना तयार आहे, त्यासाठी पाकिस्तानातील जनतेला इशारा देत असल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे. पाकिस्तान सध्या आत्महत्येच्या वाटेवर आहे, जर योग्य निर्णय झाले नाहीत, तर पहिला बळी सैन्यदलाचा जाईल, अशी शक्यताही इम्रान यांनी वर्तवली आहे. युक्रेनप्रमाणे पकिस्तानची अण्वस्त्रही जातील अशी भीतीही त्यांनी वर्तवली आहे.

पाकिस्तानला धोक्याचा इशारा

इम्रान खान यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान सोमरच्या धोक्यांची यादीच वाचून दाखवली आहे. आर्थिक पातळीवर देशाचे नाव दोषींच्या यादीत जाण्याची भीती त्यांनी वर्तवली आहे. ही पाकिस्तान आणि सैन्यासमोरची मुख्य समस्या आहे. जर या स्थितीत सैन्याने योग्य निर्णय घेतला नाही तर ते नष्ट होतील, सर्वात आधी सैन्याचा बळी जाईल, हे लिहून देण्यास तयार असल्याचे इम्रान म्हणाले. ज्यावेळी देशाचे मोठे नुकसान झालेले असेल त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला अण्वस्त्रांचा त्याग करण्याचे सांगण्यात येईल. १९९० साली हेच युक्रेनमध्ये घडले होते, याची आठवणही त्यांनी करुन दिली आहे.

भारतातील थिंक टँक स्वतंत्र बलुचिस्तानच्या निर्मितीसाठी आग्रही

परेदशांमध्ये भारतीय थिंक टॅंक स्वतंत्र बलुचिस्तान देशाच्या निर्मितीसाठी जोर लावत आहे. त्यांच्याकडे याची योजनाही तयार आहे, त्यामुळे आपण पाक सरकारवर दबावआणत असल्याचेही इम्रान यांनी सांगितले. पाकिस्तानातील शहबाज सरकार ही अमेरिकेला खूश ठेवण्याचा प्रयत्न करेल, कारण नवाज शरीफ आणि असील अली जरदारी नेहमीच अमेरिका, भारत आणि इस्रायल यांच्या आघाडीसाठी स्वखुशीने काम करतील. असा आरोपही त्यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

शहबाज सरकारला हेतूवर शंका

शहबाज सरकारची योजना ही पाकिस्तान मजबूत करण्याची नाही. आपल्याला जेव्हा पदावरुन हटवण्यात आले तेव्हा भारतात जल्लोष करण्यात आला, जसे काही शहबाज हे भारतीय आहेत आणि ते सत्ते आले आहेत, असे त्याचे स्वरुप होते, अशी टीकाही इम्रान यांनी केली. स्वतंत्र परराष्ट्र धोरण असल्यानेच आपल्याला भारताचा विरोध झाला असेही इम्रान म्हणाले. ज्या ज्यावेळी तु्मही स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवता, तेव्हा बऱ्याचदा तुम्हाला नकारच द्यावा लागतो, असेही इम्रान यांनी सांगितले आहे.

अमेरिकेतून आलेल्या धमकीच्या पत्राची चौकशी व्हावी

अमेरिकेतून इम्रान यांना आलेल्या धमकीच्या पत्राचा तपास सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पत्रात सरकार पाडण्याबाबत दावा होता, असे इम्रान यांचे म्हणणे आहे. पुन्हा एकदा इस्लामाबादेत आंदोलन करणार असल्याचे इम्रान यांनी सांगितले आहे, मात्र त्याचवेळी हा आझादी मार्च कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.