Video : आकाशात शेकडो फूट उंचावर हॉट एअर बलूनला आग, 8 जणांचा खाली पडून मृत्यू; हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर!

Hot Air Balloon Blast Accident Video : आकाशात हजारो फूट उंचावर एक धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत तब्बल आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Video : आकाशात शेकडो फूट उंचावर हॉट एअर बलूनला आग, 8 जणांचा खाली पडून मृत्यू; हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर!
hot air balloon accident (सांकेतिक पोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)
| Updated on: Jun 21, 2025 | 9:25 PM

Brazil Hot Air Balloon Blast Accident Video : आजकाल कुठेतरी दूर, परदेशात फिरायला जाण्याचं प्रमाण चांगलंच वाढलं आहे. फिरायला गेल्यानंतर अनेकजण वेगवेगळे साहसपूर्ण खेळ खेळतात. मात्र हेच खेळ कधीकधी आपला जीवही घेऊ शकतात. दरम्यान, फिरायला म्हणून गेलेल्या आणि साहसपूर्ण खेळ खेळण्याच्या नादात तब्बल आठ जणांनी जीव गमावला आहे. हे आठ जण हॉट एअर बलूनच्या मदतीने उंच आकाशात गेले होते. मात्र हा बलून फुटल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नेमकी घटना कुठे, कधी घडली?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ फारच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक हॉट एअर बलून फुटून त्याला आग लागल्याचे दिसतेय. याच हॉट एअर बलूनमध्ये बसललेल्या आठ जणांचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या हॉट एअर बलूनमध्ये एकूण 21 लोक होते. त्यापैकी 13 जणांचे प्राण वाचवण्यात यश आली आहे. ही घटना ब्राझील या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या देशात घडली आहे. शनिवारी म्हणजेच 21 जून रोजी ही धक्कादायक घटना घडली आहे. हा हॉट एअर बलून फुटल्यानंतर त्याला आग लागली आणि त्यात बसलेले आठ जण हजारो फूट उंचावरून खाली जमिनीवर कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झालाय.

रॉकेटप्रमाणे बलून आला खाली, 8 जणांचा जागेवरच मृत्यू

हजारो फूट ऊंचावरून कोसळल्यानंतर या हॉट एअर बलूमध्ये बसलेल्या आठ जणांचा जागेवरच मृत्यू झालाय. व्हायरल व्हिडीओमध्ये हॉट एअर बलूनला आग लागल्यानंतर त्या बलूनच्या खालचा भाग (बेस) एखाद्या रॉकेटप्रमाणे खाली येताना दिसतोय. तर वरचा बलूनच्या भागाला आग लागल्यामुळे तो जळताना दिसतोय. बलूनच्या बेसमध्ये बसलेले आठ लोक खाली कोसळताना दिसत आहेत.

साहसपूर्ण खेळ खेळताना काळजी घेण्याचे आवाहन

दरम्यान, या भीतीदायक घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमावर चर्चेचा विषय बनला आहे. तसेच कुठेही फिराला जाताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. नको ते साहस दाखवू नये. हवामान, गर्दी तसेच अन्य बाबींचा विचार करूनच काहीही करण्याचा निर्णय घ्यावा, अशी सूचना केल्या जात आहेत.