
इस्रायली सैन्य खतरनाक ऑपरेशन्स करण्यासाठी ओळखलं जातं. इस्रायली सैन्याने आतापर्यंत अनेक थक्क करुन सोडणारे पराक्रम गाजवले आहेत. IDF ने काही दिवसांपूर्वी हमासच्या कैदेतून चार बंधकांची सुटका केली. हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबरला नोवा म्यूजिकल फेस्टिवलमधून या बंधकांच अपहरण केलं होतं. तेव्हापासून हे सर्व हमासच्या कैदेत होते. त्यांच्या सुटकेसाठी इस्रायली सैन्याला स्पेशल ऑपरेशन करावं लागलं. यात एअर फोर्स, आर्टिलरी कमांड आणि कमांडो मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समुद्रमार्गे पॅलेस्टाइनच नियंत्रण असलेल्या प्रदेशात ते घुसले. या ऑपरेशनमध्ये शिन बेट आणि इस्रायली पोलिसांची यमाम ATS युनिट सहभागी झाली होती. ऑपरेशनमध्ये यमामचा एक जवान गंभीररित्या जखमी झाला. या ऑपरेशनचा प्लान काही आठवड्यापूर्वीच आखण्यात आला होता. विश्वसनीय आणि ठोस गोपनीय माहितीच्या आधारावर योजना बनवण्यात आली होती. बंधकांची सुटका करायचीच, यासाठी IDF कटिबद्ध होती. IDF चे प्रवक्ते रियर एडमिरल डॅनियल हगारी यांनी ही माहिती दिली. ...