अमेरिकेच्या एअर स्ट्राईकमध्ये इराणच्या अणू केंद्रांचं किती नुकसान? पहिलं छायाचित्र समोर

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, याचदरम्यान शनिवारी मध्यरात्री अमेरिकेकडून इराणवर एअर स्ट्राईक करण्यात आला. या एअर स्ट्राईकला अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाइट हॅमर असं नाव दिलं.

अमेरिकेच्या एअर स्ट्राईकमध्ये इराणच्या अणू केंद्रांचं किती नुकसान? पहिलं छायाचित्र समोर
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
| Updated on: Jun 22, 2025 | 9:18 PM

इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे, याचदरम्यान शनिवारी मध्यरात्री अमेरिकेकडून इराणवर एअर स्ट्राईक करण्यात आला. या एअर स्ट्राईकला अमेरिकेनं ऑपरेशन मिडनाइट हॅमर असं नाव दिलं. या ऑपरेशन अंतर्गत अमेरिकेनं इराणच्या तीन अणू तळांवर बॉम्ब टाकले, ज्यामध्ये फोर्डो, नतांज आणि इस्फहान या ठिकाणांचा समावेश आहे. अमेरिकेनं आपल्या या मिशनमध्ये ७ बी-२ स्पिरिट स्टेल्थ बॉम्बर्सचा वापर केला. अमेरिकेनं केलेल्या या हल्ल्यामध्ये इराणच्या या अणू तळांचं किती नुकसान झालं? या संदर्भातील सॅटेलाइट छायाचित्र आता समोर आले आहेत.मॅक्सारच्या या सॅटेलाइट छायाचित्रांमध्ये इराणच्या फोर्डो या अणू तळावर अमेरिकेनं जिथे बॉम्ब हल्ला केला तिथे सहा मोठे होल दिसत आहेत. अमेरिकेनं ही कारवाई पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.

फोर्डो हे इराणमधील सर्वात सुरक्षित आणि मजबूत अणुऊर्जा केंद्र मानलं जातं. इराणचं हे अणुऊर्जा केंद्र तेहरानच्या दक्षिणेस 100 किलोमीटर असलेल्या एका पर्वताखाली 80 ते 90 मीटर खोल उभारण्यात आलं आहे. जिथे अणुशस्त्रांसाठी आवश्यक असलेल्या युरेनियमपैकी 85 टक्के युरेनियमचं उत्पादन सुरू होतं.फोर्डो या अणू केंद्राला रशियन-निर्मित हवाई संरक्षण प्रणाली (S-300) संरक्षण होतं, तसचे हे अणू केंद्र जाड खडकांच्या कवचाखाली असल्यामुळे त्याला लक्ष करणं जवळपास अशक्य मानलं जात होतं.

मात्र अमेरिकेनं इराणच्या या तळावर हल्ला केला, अमेरिकेच्या या हल्ल्यामध्ये इराणच्या या तळाचं किती नुकसान झालं याचं एक सॅटेलाइट छायाचित्र आता समोर आलं आहे, त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, या हल्ल्यामध्ये इराणच्या या अणू तळांच किती नुकसान झालं आहे. जिथे हे अणू केंद्र होतं त्याच्यावर सहा मोठे होल पडल्याचं दिसून येत आहे. मिशन यशस्वी ठरल्याचा दावा अमेरिकेकडून केला जात आहे.

दरम्यान दुसरीकेड मात्र यावर रशियाकडून पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे, अमेरिकेचं मिशन अयशस्वी ठरल्याचं रशियानं म्हटलं आहे, इराणला अण्वस्त्र देण्यासाठी आज अनेक देश तयार आहेत, त्यामुळे हे मिशन अयशस्वी ठरल्याचं रशियानं म्हटलं आहे.