
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतावर व्यक्तीगत राग काढत आहेत. म्हणूनच त्यांनी सर्व देश सोडून भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. ट्रम्प यांच्या टप्प्यात भारतच नाही, तर रशिया आणि चीन हे देश सुद्धा आले आहेत. याचा अर्थ असा आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यावेळी रशिया, भारत आणि चीन तिघांवर एकाचवेळी हल्ला करतायत. या स्थितीत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतोय की, हे तीन देश मिळून अमेरिकेची दादागिरी संपवू शकतात का?. अमेरिकेला सर्वात जास्त फायदा ग्लोबल मार्केटमध्ये डॉलरच्या ट्रेडमधून होतो. त्यामुळे रशिया, भारत आणि चीन मिळून डॉलरचा सामना करु शकतात का?. या प्रश्नाच उत्तर अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चिडचिडीतून मिळतं. तुम्हाला आठवत असेल, ब्रिक्स परिषदेच्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी डॉलरला पर्याय शोधणाऱ्या रशिया, भारत आणि चीनला धमकी दिलेली. ट्रम्प यांनी म्हटलेलं की, ब्रिक्स देशांनी एकत्र येऊन डॉलरला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, तर या देशांवर...