ग्रीनलँडवर कब्जा करण्यासाठी हे देशही तयार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नजर व्हेनेझुएला नंतर ग्रीनलँडवर गेली आहे. त्यांनी मोठ्या कारवाईचे संकेत दिले आहेत. आपण या देशाच्या भल्यासाठी असे करत आहोत असा दावाही त्यांनी केला आहे.

ग्रीनलँडवर कब्जा करण्यासाठी हे देशही तयार, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ
Donald Trump and Green Land Row
| Updated on: Jan 10, 2026 | 3:58 PM

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा व्हेनेझुएलाचे सरकार बरखास्त केल्यानंतर त्यांनी ग्रीनलँडकडे वक्रदृष्टी टाकली आहे. ग्रीनलँडकडे अब्जावधी रुपयांची नैसर्गिक साधनसामुग्री असल्याने असे केल्याचा आरोप होत आहे. परंतू डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईला तात्विक मुलामा देश ग्रीनलँडला सामावून घेण्यामागे राष्ट्रीय सुरक्षेचा मामला असल्याचा अजब युक्तीवाद केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल ट्रम्प यांनी(US President Donald Trump) शुक्रवारी ग्रीनलँड संदर्भात बोलताना आम्ही काही पावले उचलू असा गर्भित इशारा दिला आहे. मग भले डेन्मार्कला ते पसंद पडो न पडो असेही ते म्हणाले आहेत. त्यांनी जर सौदा सहज झाला नाही तर अवघड पद्धतीने करावा लागेल असेही त्यांनी धमकावले आहे. म्हणजे सीधी ऊंगली से घी नही निकला तो ऊंगली तेडी करनी होगी असाच दम ट्रम्प यांनी दिला आहे.

ग्रीनलँडचे भौगोलिक स्थान धोरणात्मक महत्व आणि खनिज संपत्ती यामुळे अमेरिका यास राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा मानत आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहेत जर आम्ही ग्रीनलँड विरोधात पावले उचलली नाही तर रशिया वा चीन याचा फायदा घेऊ शकतात, आणि आम्ही असे कदापी होऊ देणार नाही असाही दावा ट्रम्प यांनी केला आहे.

मात्र डेन्मार्कच्या प्रती आम्हाला आदर आहे आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘मी डेन्मार्कचा चाहता आहे. परंतू पुढे ट्रम्प म्हणाले की ५०० वर्षांपूर्वी तेथे एक जहाज पोहचले होते, याचा अर्थ हा नाही की ते संपूर्णपणे मालक आहेत.’

येथे पाहा पोस्ट –

डेन्मार्क आणि यूरोपीय देशांंची प्रतिक्रिया

डेन्मार्कचे  पंतप्रधान मेत्ते फ्रीडरिकसेन यांनी ग्रीनलँडवर कोणत्याही आक्रमक पावलांआधी नाटो आणि पारंपारिक संरक्षण ढाच्यावर गंभीर परिणाम होईल. युरोपियन देशांनी देखील ट्रम्प यांच्या धोरणावर चिंता व्यक्त केली आहे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

ग्रीनलँडमध्ये आधीपासूनच अमेरिकेचा सैन्य तळ आहे. परंतू स्थानिक अधिकारी आणि जनतेने स्पष्ट केले आहे की कोणताही निर्णय त्यांचे हित आणि स्वायत्तेचा सन्मान करत झाला पाहिजे. ट्रम्प यांच्या या वक्तव्याने अमेरिका आणि युरोपात राजकीय चर्चा आणखी वाढू शकते.मात्र ग्रीनलँड येथील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि धोरणात्मक महत्व या प्रकरणाला आणखीन संवेदनशील बनवत आहेत.