AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचे संरक्षण बजेट 50 टक्के वाढणार, या तीन देशात टेन्शन, भारताचे स्थान काय ? सर्वात जास्त खर्च कुठे ?

अमेरिका आणि भारताच्या संरक्षण बजेटमध्ये खूपच अंतर आहे. अमेरिकेचे बजेट पन्नाट टक्के वाढवण्याची योजना डोनाल्ड ट्रम्प यांनी आखली आहे. भारताचे स्थान काय आहे हे पाहणे देखील महत्वाचे आहे.

अमेरिकेचे संरक्षण बजेट 50 टक्के वाढणार, या तीन देशात टेन्शन, भारताचे स्थान काय ? सर्वात जास्त खर्च कुठे ?
US Defence Budget - Donald Trump
| Updated on: Jan 08, 2026 | 4:01 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या देशाचे संरक्षण बजेटमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. अमेरिकेची योजना संरक्षण बजेट ५० टक्के वाढवून १.५ ट्रीलियन डॉलर करण्याची आहे. हा निर्णय यासाठी महत्वाचा आहे कारण अमेरिका आधीच जगातला संरक्षण खर्चावर जास्त पैसा करणार देश आहे. या घोषणेनंतर भारतातही संरक्षण बजेटवर चर्चा सुरु झाली आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे लक्ष ग्रीन लँडवर (Greenland ) आहे., कोलंबिया (Colombia ) मेक्सिको (  Mexico) या देशांनाही देखील यामुळे धडकी भरली आहे.

अलिकडे आलेल्या आकडेवारीनुसार अमेरिका आणि भारताच्या संरक्षण बजेटमध्यू खूपच अंतर आहे. अमेरिकेच्या संरक्षण बजेटच्या तुलनेत अमेरिकेचे संरक्षण बजेट अनेक पटींनी जास्त आहे. परंतू भारतही स्वत:च्या संरक्षण बजेटवर जादा पैसा खर्च करत आला आहे. ही तुलना दोन्ही देशांची सैन्य क्षमता आणि धोरणात्मक प्राधान्य समजण्यास मदत होईल.

किती आहे अमेरिकेचे संरक्षण बजेट

आर्थिक वर्षे २०२५ साठी अमेरिकेचे संरक्षण बजेट सुमारे ८५० अब्ज अमेरिकन डॉलर ठेवण्यात आले आहे. हे बजेट अमेरिकेच्या सरंक्षण विभागाने प्रस्तावित केले आहे. या खर्चातून सैन्य दल, नाविक दल आणि वायू दल आणि स्पेस फोर्सच्या गरजांची पुर्तता केली जाणार आहे. यात नवीन तंत्रज्ञानाची शस्रास्रे आणि सैन्यांच्या खर्चाचा अंतर्भाव आहे. अमेरिका जगातला संरक्षणावर सर्वात जास्त खर्च करणारा देश आहे.

भारताचे स्थान काय ?

भारताचे आर्थिक वर्षे २०२५-२६ साठी संरक्षण बजेट ६.८१ लाख कोटी रुपये ठेवले आहे. डॉलरमध्ये विचार करता ते सुमारे ७८ ते ७९ अमेरिकन डॉलरच्या आसपास आहे. हे बजेट गेल्या वर्षाच्या तुलनेत ९.५ टक्के जास्त आहे.यात सैन्यदल, नाविक दल, वायूदल आणि पेन्शनचा खर्चाचा समावेश आहे. भारताचा आशियात सर्वाधिक सैन्य खर्च करणाऱ्या देशात समावेश आहे.

महत्वाते मुद्देअमेरिका भारत
आर्थिक वर्ष20252025 - 2026
एकूण संरक्षण बजेटसुमारे 850 अब्ज डॉलर6.81 लाख कोटी रुपये
डॉलरमध्ये अंदाजित बजेट850 अब्ज डॉलर 78 ते 79 अब्ज डॉलर
जागतिक रँक जगात सर्वात जास्त आशियातील जास्त खर्च करणाऱ्या देशात समावेश
बजटचे फोकसजागतिक सैन्य तैनाती सीमा सुरक्षा आणि आधुनिकीकरण
प्रमुख खर्च फायटर जेट ,मिसाईल, नेवी कॅरियर संशोधनसैन्यदल, नौसेना, वायुसेना,कर्मचारी पेन्शन
रणनीतीग्लोबल डॉमिनन्स क्षेत्रीय सुरक्षा आणि स्वदेशी उत्पादन

अमेरिका आणि भारताच्या संरक्षण बजेटची तुलना

जर दोन्ही देशांची तुलना करायची झाली तर अमेरिकेचे संरक्षण बजेट भारताच्या तुलनेत १० पट जादा आहे. अमेरिकेचा फोकस जागतिक सैन्य तैनातीवर असतो. तर भारताच्या संरक्षण बजेट मुख्य रुपाने संरक्षण आणि क्षेत्रीय धोक्यांवर केंद्रीत आहेत. संरक्षण बजेटमधील हे अंतर दोन्ही देशांची भूमिका आणि जबाबदारी दाखवत आहेत.

अमेरिका कशावर जास्त खर्च करते.

अमेरिका त्यांच्या संरक्षण बजेटचा मोठा हिस्सा अत्याधुनिक शस्रास्रे आणि संशोधनावर खर्च करते. यात फायटर जेट, मिसाईल , डिफेन्स सिस्टीम आणि नौदलाच्या नौकांचा समावेश आहे. या शिवाय अमेरिकेचे सैन्य जगातील अनेक देशात तैनात असते. यामुळे देखील अमेरिकेच्या बजेटमध्ये ऑपरेशनल खर्च देखील जास्त असतो.

भारताचे प्राध्यान्य काय आहे ?

भारत आपल्या संरक्षण बजेटच्या वापर अत्याधुनिकीकरण आणि स्वदेश उत्पादनावर करत आहे. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण बजेटला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सीमेवर तैनाती आणि सैनिकांची गरज यावर देखील लक्ष दिले जात आहे. भारताचे लक्ष्य मर्यादिक संसाघानात प्रभावी आणि मजबूत संरक्षण तंत्रज्ञान विकसित करण्याकडे आहे.

Dhurandhar: भारताला जवळचा मित्र मानणारा 'हा' देश 'धुरंधर'वर का नाराज?
Dhurandhar: भारताला जवळचा मित्र मानणारा 'हा' देश 'धुरंधर'वर का नाराज?.
महापौर पदावरून रणकंदन... मग फडणवीस हिंदू आहेत की नाही?
महापौर पदावरून रणकंदन... मग फडणवीस हिंदू आहेत की नाही?.
ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत! नितेश राणे यांची जहरी टीका
ठाकरेंना मत म्हणजे जिहाद्याला मत! नितेश राणे यांची जहरी टीका.
अंडी-पिल्ली ते बिनदाढीवाला गरूडा..दादा, रोहित पवार अन भाजपमध्ये जुंपली
अंडी-पिल्ली ते बिनदाढीवाला गरूडा..दादा, रोहित पवार अन भाजपमध्ये जुंपली.
त्यांचा पत्त्याचा बंगला उलटा, राज ठाकरेंचा रोख कुणावर अन् कुणाला टोला?
त्यांचा पत्त्याचा बंगला उलटा, राज ठाकरेंचा रोख कुणावर अन् कुणाला टोला?.
म्हातारे झालो म्हणून...'सर्टिफाईड नागपूरकर'ला राऊतांचं प्रत्युत्तर
म्हातारे झालो म्हणून...'सर्टिफाईड नागपूरकर'ला राऊतांचं प्रत्युत्तर.
बॅलेट पेपरवरून राज ठाकरे पुन्हा मैदानात,BJP च्या पराभवाचे पाढेच वाचले
बॅलेट पेपरवरून राज ठाकरे पुन्हा मैदानात,BJP च्या पराभवाचे पाढेच वाचले.
एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले...
एकनाथ शिंदे अन् संजय राऊतांच्या भेटीवर राऊत स्पष्टच बोलले....
पुन्हा दोन्ही NCP एकत्र येणार? अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
पुन्हा दोन्ही NCP एकत्र येणार? अजितदादांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण.
जेव्हा राऊत अन् शिंदे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येतात...
जेव्हा राऊत अन् शिंदे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच आमने-सामने येतात....