AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केले हात वर, म्हणाले, इंधन पाहिजे तर आमच्याकडून विकत घ्या, अन्यथा होर्मुजमध्ये स्वत:च लढा

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सहकारी देशांना स्ट्रेट ऑफ होर्मुज संकटादरम्यान अमेरिकेवर अवलंबून राहू नका. ट्रम्प यांनी ब्रिटन आणि फ्रान्सवरही टीका केली आहे. त्यांनी अमेरिकेकडून तेल विकत घ्यावे आणि स्वत:चे संरक्षण स्वत:च करावे असेही म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी केले हात वर, म्हणाले, इंधन पाहिजे तर आमच्याकडून विकत घ्या, अन्यथा होर्मुजमध्ये स्वत:च लढा
DONALD TRUMP
| Updated on: Mar 31, 2026 | 9:42 PM
Share

इराण युद्धात बॅकफुटवर जावे लागल्याने संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सहकारी देशांना कठोर इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी या देशांना म्हटले आहे की त्यांनी सुरक्षा आणि गरजांसाठी स्वत: जबाबदार घ्यावी लागेल. त्यांनी सहकारी देशांना दोन सल्ले दिले. पहिला सल्ला जे देश स्ट्रेट ऑफ होर्मुझमुळे जेट इंधनाच्या कमतरतेला झेलत आहेत ते अमेरिकेकडून तेल खरेदी करु शकतात. कारण अमेरिकेकडे पुरेसे तेल आहे.

ट्रम्प यांनी विशेष करुन ब्रिटनचा उल्लेख केला. ते म्हणाले की ब्रिटनने इराणच्या विरोधातील कारवाईत भाग घेतला नाही. परंतू आता त्याला जेट इंधनाचा सामना करावा लागत आहे. दुसरा सल्ला देताना ट्रम्प म्हणाले की या देशांनी हिंमत दाखवावी आणि गरज पडेल तर स्ट्रेट ऑफ होर्मुझवर स्वत: कंट्रोल करुन ते मिळवावे. ट्रम्प म्हणाले की, ‘तुम्हाला स्वत:ला लढायला शिकायला हवे, अमेरिका नेहमी तुमच्यासोबत राहणार नाही.’

ट्रम्प यांच्या वक्तव्याचा अर्थ काय ?

ट्रम्प यांच्या वक्तव्याचा अर्थ सुरक्षा असो की तेल पुरवठा, आता सहयोगी देशांना स्वत: पुढे यायला हवे. ट्रम्प यांचा इशारा स्पष्ट आहे की जो देश अमेरिकेच्या बाजूने उभे राहिले नाहीत. आता अमेरिका त्यांच्यापासून अंतर राखणार. ट्रम्प म्हणाले की इराण बऱ्याच अंशी कमजोर केले आहे. आणि युद्धाचा अवघड भाग पूर्ण झाला आहे. आता पुढील जबाबदारी दुसऱ्या देशांनी निभवायला हवी. आणि स्वत:च्या तेलाच्या गरजांना स्वत: पूर्ण करायला हवे.

फ्रान्सवर देखील टीका

अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांनी फ्रान्सवर नाराजी व्यक्त केली. फ्रान्सने इस्रायलला जाणाऱ्या अमेरिकन सैन्यांच्या विमानांना त्यांच्या हवाई क्षेत्रातून जाण्याची परवानगी दिलेली नाही, यास ट्रम्प यांनी हे वाईट कृत्य असून अमेरिका यास लक्षात ठेवले असेही म्हटले आहे. इराण युद्धामुळे मध्य पूर्वेत ३,००० हून अधिक लोक ठार झाले आहेत. इराणच्या  उपआरोग्य मंत्र्याच्या मते इस्रायली आणि अमेरिकन हल्ल्यात १,९०० हून अधिक लोक ठार झाले आहेत. लेबनॉनमध्ये किमान १,२०० लोक ठार झाले आहेत. इस्रायलमध्ये १९ लोक ठार झाले आहेत. आतापर्यंत १३ अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा