संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानसोबत तुर्कस्तानला पण झापलं, कोण आहे भारताची ही बिनधास्त अधिकारी

| Updated on: Feb 29, 2024 | 8:26 PM

Who is Anupama Singh : भारतीय उच्च अधिकारी अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानसह त्याची बाजु घेणाऱ्या तुर्कस्तानला ही चांगलेच धारेवर घेतले आहे. त्यामुळे पाकिस्तानला तर आरसा दाखवलाच आहे पण तुर्कस्तानला पण भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला आहे.

संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानसोबत तुर्कस्तानला पण झापलं, कोण आहे भारताची ही बिनधास्त अधिकारी
Follow us on

India in UN : भारताने अनेकदा पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. पण तरी देखील तो त्यातून धडा घेताना दिसत नाही. पाकिस्तानकडून सतत भारतविरोधी कारवाया सूरुच असतात. पण जेव्हा जेव्हा काश्मीरचा मुद्दा येतो तेव्हा तेव्हा भारत पाकिस्तानवर जोरदार हल्ला करतो. पण यावेळी पाकिस्तानसोबत तुर्कस्तानला देखील ऐकून घ्यावे लागले आहे. संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा उचलून धरल्याने पण भारताच्या शूर कन्येने दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला तर झापलेच पण तुर्कस्तानला ही आरसा दाखवला आहे.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (UNHRC) 55 व्या सत्रात जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंग यांनी पाकिस्तानला चांगलेच झापले. पाकिस्तानला त्यांच्या नापाक प्रयत्नांबाबत आरसा दाखवला. काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय आहे. त्यावर इतर कोणीही बोलण्याची गरज नाही अशा शब्दात पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर अनुपमा सिंग यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांचं जोरदार कौतूक होत आहे.

कोण आहेत अनुपमा सिंह

  • अनुपमा सिंह या 2014 च्या बॅचच्या भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी आहेत.
  • अनुपमा सिंह यांनी दिल्ली विद्यापीठातून फायनान्समध्ये एमबीए केले आहे. याआधी त्यांनी बी.टेक पदवी प्राप्त केलीये.
  • अनुपमा सिंह या संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी मिशनमध्ये प्रथम सचिव आहेत.
  • 2014 पासून ते भारतीय परराष्ट्र सेवेत मुत्सद्दी म्हणून कार्यरत आहेत.
  • याआधी अनुपमा सिंह यांनी केपीएमजीमध्ये दोन वर्षे तीन महिने काम केले होते.
  • जुलै 2012 मध्ये त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
  • ऑक्टोबर 2013 ते सप्टेंबर 2014 पर्यंत त्यांनी वरिष्ठ सल्लागार म्हणून काम केले.

अनुपमा सिंह काय म्हणाल्या?

आयएफएस अनुपमा सिंह यांनी तुर्किये यांनी केलेल्या टिप्पणीवर पहिल्यांदा खेद व्यक्त केला आणि काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे स्पष्ट केले. यानंतर त्यांनी पाकिस्तानला खडसावले.


‘ज्या देशाचे हात जगभर पुरस्कृत दहशतवादाच्या रक्तपातामुळे ‘लाल’ झाले आहेत, त्या देशाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांचे सरकार त्यांचे खरे हित साधण्यात अयशस्वी ठरले आहे याची त्यांच्याच लोकांना लाज वाटते.’