AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फँड्री’मधील शालूचा लोकप्रिय गाण्यावर डान्स, अदा पाहून चाहते झाले फिदा, Video व्हायरल

फँड्रीमधील शालूचा लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स. अदा आणि हटके स्टेप पाहून चाहत्यांच्या खिळल्या नजरा. डान्स व्हिडीओची होतेय प्रचंड चर्चा.

‘फँड्री’मधील शालूचा लोकप्रिय गाण्यावर डान्स, अदा पाहून चाहते झाले फिदा, Video व्हायरल
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 12, 2026 | 7:21 PM
Share

Rajeshwari Kharat : मराठी चित्रपटसृष्टीत ‘फँड्री’ या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. गुलाबी रंगाच्या साडीमध्ये तिने केलेला डान्सचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये राजेश्वरी खरातने संजू राठोडच्या सर्वात प्रसिद्ध गाणं ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यावर जोरदार ठेका धरताना दिसत आहे. यामधील तिचा डान्स आणि तिचे हावभाव सध्या खूपच चर्चेत आले आहेत. तिच्या स्टाइलिश लूक आणि एनर्जेटिक डान्समुळे चाहत्यांचे विशेष लक्ष वेधले गेले आहे. गुलाबी साडीतला तिचा लूक आणि आत्मविश्वासपूर्ण डान्स अनेकांना पसंत पडत आहे.

साडीमध्ये हटके डान्स

राजेश्वरी खरातला खरी ओळख नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात तिने साकारलेली ‘शालू’ ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आणि त्यानंतर तिला मोठी लोकप्रियता मिळाली. सोशल मीडियावरही राजेश्वरी खरात नेहमी सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिच्या या डान्स व्हिडिओलाही चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.

अनेक चाहत्यांनी तिच्या डान्सचे आणि लूकचे कौतुक केले आहे. काहींनी ‘तुझा डान्स जबरदस्त आहे’, हे गाणं तूझ्यावरच सूट होत तसेच अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात शेअरही केला जात आहे. त्यामुळे ‘फँड्री’मधील शालू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

अभिनेत्रीने स्विकारला ख्रिश्चन धर्म

अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी तिचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यात ती पाण्यामध्ये हात जोडून उभी असलेली दिसली. तिने हा फोटो शेअर करताना खास कॅप्शन लिहिलं होतं की, बाप्तिस्मा स्वीकारलं.

याशिवाय तिने एक ग्रुप फोटो देखील शेअर केला आहे आणि लिहिले की, ‘परमेश्वर म्हणतो की, माझ्याकडे तुमच्यासाठी योजना आहेत, ज्या मला माहित आहे’. हॅशटॅगमध्ये तिने नवीन सुरूवात. बाप्तिस्मा स्वीकारल्याचे सांगितले आहे. यामुळे ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली होती.

Follow Us
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...