AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडिया एकाच वेळी खेळणार दोन मालिका! बीसीसीआय आखणार दोन कर्णधारांसह खास रणनिती

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा संपली असून आयपीएल 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. असं असताना टीम इंडियाचं पुढचं वेळापत्रकही ठरवलं जात आहे. यावेळी एकाच वेळी दोन मालिका खेळण्याची वेळ टीम इंडियावर येऊ शकते.

टीम इंडिया एकाच वेळी खेळणार दोन मालिका! बीसीसीआय आखणार दोन कर्णधारांसह खास रणनिती
टीम इंडिया एकाच वेळी खेळणार दोन मालिका! बीसीसीआयने आखली दोन कर्णधारांसह खास रणनितीImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Mar 12, 2026 | 7:25 PM
Share

भारताने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आणि जेतेपद मिळवलं. आता टीम इंडियाच्या पुढच्या वाटचालीसाठी बीसीसीआय आतापासून रणनिती आखत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2027 आणि वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी खास रणनिती असणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय एकाच वेळी दोन संघ मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. ऑक्टोबर महिन्यात ही रणनिती आखली जाईल. कारण या महिन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. तसेच एशियन्स गेम्समध्येही भाग घेणार आहे. जापानमध्ये एशियन्स गेम्सचं आयोजन करण्यात आलं आहे. यात भारताची टी20 संघ भाग घेणार आहे. भारत मागच्या एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकला होता. 2021 मध्ये अशीच स्थिती उद्भवली होती. तेव्हा दोन संघ तयार केले होते. विराट कोहलीच्या नेतृत्वात एक संघ इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामना खेळण्यासाठी गेला होता. तर दुसरा संघ शिखर धवनच्या नेतृत्वा श्रीलंकेत वनडे आणि टी20 मालिका खेळला होता.

या वर्षीही बीसीसीआयला 30 खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. यापैकी 15 खेळाडू एशियन्स गेम्समध्ये गोल्ड मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतील. तर 15 खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळतील. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत शुबमन गिलच्या नेतृत्वात संघ उतरेल यात काही शंका नाही. कारण 2027 वनडे वर्ल्डकपच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. दरम्यान, भारतात क्रिकेटच्या दहा संघ तयार होतील इतके खेळाडू आहेत. त्यामुळे एशियन्स गेम्ससाठी संघ निवडताना कोणतीही अडचण येणार नाही. वनडे वर्ल्डकपच्या हिशेबाने त्यातल्या त्यात चांगले खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरतील.

एशियन गेम्स 2026 स्पर्धेचं आयोजन जापानमध्ये 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलं आहे. एशियन गेम्समध्ये टी20 फॉर्मेटमध्ये सामने होतील. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात संघ जापानला जाण्याची शक्यता आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं आहे.  मागच्या पर्वात ऋतुराज गायकवडच्या नेतृत्वात एशियन्स गेम्स 2022 मध्ये भाग घेतला होता. तेव्हा भारताने सुवर्ण पदक मिळवलं होतं.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल