Bakri Eid 2025 : या मुस्लिम देशात बकरी ईदवरच संक्रांत, त्या एका निर्णयाने नागरिकांमध्ये एकच खळबळ, बकऱ्यांच्या कुर्बानीबाबत…

Bakra Eid 2025 : सध्या बकरी ईदची तयारी सुरू आहे. पण या मुस्लिम देशातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. राजाच्या त्या एका निर्णयाने बकरी ईदवरच संक्रांत आली आहे. काय आहे तो निर्णय? का झालेत नागरिक नाराज?

Bakri Eid 2025 : या मुस्लिम देशात बकरी ईदवरच संक्रांत, त्या एका निर्णयाने नागरिकांमध्ये एकच खळबळ, बकऱ्यांच्या कुर्बानीबाबत...
बकरी ईद 2005
Image Credit source: गुगल
| Updated on: Jun 05, 2025 | 10:31 AM

Morocco King Mohammed VI : ईद प्रमाणेच बकरी वा बकरा ईद हा मुस्लिमांमधील एक मोठा सण आहे. इस्लाम जगत हे प्रत्येक वर्षी बकरी ईदची प्रतिक्षा करते. या काळात अल्लाह प्रति निष्ठा व्यक्त केली जाते. त्याग केला जातो. यावर्षी 6-7 जून रोजी बकरी ईद साजरी होईल. पण मुस्लिम देश मोरक्कोमध्ये राजाच्या एका निर्णयाने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राजाच्या एका फर्मानमुळे नागरिक भयभीतच झालेले नाही तर नाराजही झाले आहे. काय आहे हा निर्णय? का उडाली खळबळ?

मोरक्कोत नाही साजरी होणार बकरी ईद

मोरक्कोचा राजा मोहम्मद VI ने एक शाही फर्मान काढले आहे. सहाव्या राज्याच्या या एका आदेशाने खळबळ उडाली आहे. किंग मोहम्मद VI ने शाही फर्मानमध्ये त्याने जाहीर केले आहे की, जनतेच्या वतीने तो यंदा बकऱ्याची कुर्बानी देणार आहे. या शाही फर्माननंतर पोलिस आता मोरक्कोतील प्रत्येक घरावर छापा मारत आहे. प्रत्येक घरातील बकरे जप्त करण्यात येत आहेत. येथील नागरिकांनी यंदा बकऱ्याची कुर्बानी देता येणार नाही.

बकरी ईदवर जनतेचा आक्रोश

किंग मोहम्मद VI याच्या या विचित्र आदेशामुळे सर्वच जण अचंबित झाले आहे. आर्थिक आणि आरोग्याचे कारण पुढे करत हे शाही फर्मान काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या मुस्लिम देशातील नागरिक नाराज झाले आहेत. हा इस्लामी परंपरेवर आघात असल्याचे नागरिक मानत आहेत. आमच्या राजाने इस्लामी रूढी आणि परंपरांचा अनादर आणि अपमान केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. राजाने मुस्लिमांच्या परंपरांची गंमत उडवल्याचा आरोप करण्यात येत आहे. राजा त्याचे अपयश झाकण्यासाठी हा खटाटोप करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तर मुस्लिम स्कॉलर, विद्वानांनी हा दिवाळखोरीचा निर्णय असल्याचे ते म्हणाले. सर्वसामान्य मुस्लिमांचे अधिकार आणि त्यांच्या धार्मिक कर्तव्यावर हे अधिक्रमण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बकरी ईदवरच मुस्लिम, राजावर नाराज झाले आहेत.