
सध्या अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्याची भरपूर चर्चा होत आहे. काही मुद्यांवरुन अमीर खान मुत्ताकी यांच्या भारत दौऱ्यात वाद सुद्धा झाले. उदहारणार्थ त्यांच्या पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना प्रवेश नाकारणं. यातून तालिबानी विचारधारा दिसून आली. तालिबानच्या विचारधारेत महिलांना कुठेही स्थान नाही. चूल-मूल एवढीच त्यांची स्त्रियांबद्दलची विचारधारा आहे. या कृतीमुळे अमीर खान मुत्ताकी यांच्यावर भरपूर टीका झाली. तालिबानशी आपण का संबंध ठेवावेत? त्याचा फायदा काय? तालिबान ही मूळची दहशतवादी विचारांची संघटना आहे, असे अनेक वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रत्येक देश आपल्या हिताचा आधी विचार करतो. नैतिकता-अनैतिकता हा चष्मा बाजूला ठेवण्यातच फायदा असतो. अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीबाबत भारत सरकारचा सुद्धा असाच दृष्टीकोन आहे. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानचा झेंडा फडकला. अमेरिकेने अफगाणिस्तानातून पळ काढल्यानंतर तिथे तालिबानी राजवट आली. त्यानंतर आता पहिल्यांदाच भारताने तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्याचं...