भारताचा चीनला सर्वात मोठा दणका, थेट हाहाकार, अरुणाचल सीमेजवळील 27 ठिकाणांना..

भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष कायमच राहिला आहे. त्यामध्येच चीनकडून मोठ्या प्रमाणात काढ्या केल्या जात आहेत. भारताने मोठा दणका चीनला दिला. चीनला पळता भुई कमी भारताने केली.

भारताचा चीनला सर्वात मोठा दणका, थेट हाहाकार, अरुणाचल सीमेजवळील 27 ठिकाणांना..
China-Arunachal Pradesh border
| Updated on: Aug 09, 2026 | 6:19 AM

भारत आणि चीनमध्ये अरुणाचल प्रदेशाच्या मुद्द्यावरून कायम घमासान राहिले आहे. यावरूनच भारत आणि चीनचे संबंधही तणावात आहेत भारताच्या अरुणाचल प्रदेशावर चीन दावा करतो. यासोबतच चीन त्यांच्या नकाशात बऱ्याचदा थेट अरुणाचल प्रदेश त्यांच्याकडे दाखवतो. अरुणाचल हा भारताचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. मात्र, चीनने अरुणाचल प्रदेशच्या काही ठिकाणांना नावेही दिली आहेत, ती त्यांच्याकडून सातत्याने नकाशात दाखवली जातात. अरुणाचल प्रदेशातील विविध ठिकाणांची नावे बदलण्याच्या चीनच्या वारंवार होणाऱ्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर आता भारताने चीनला मोठा दणका दिला आहे. भारताकडून थेट निर्णय घेण्यात आला. भारत सरकारने अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणे आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची प्रमाणित नावे अधिकृत भारतीय नकाशात समाविष्ट केली, ज्यामुळे चीनला पळता भुई कमी झाली.

सर्व्हे ऑफ इंडियाकडून नकाशावर ही ठिकाणे अधिकृत करण्यात आली. एका अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याचे चीनचे प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी आणि हास्यास्पद आहेत. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग नेहमीच राहिला आहे, तो आहे आणि राहिल. अशा प्रयत्नांमुळे हे सत्य बदलू शकत नाही.

अधिकृत नकाशात समाविष्ट करण्यात आलेल्या आणि अधिकृतपणे मान्यताप्राप्त 27 ठिकाणांमध्ये ‘लाँगजूचाही समावेश आहे, जे लाइन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल’ (LAC) जवळ स्थित आहे, असेही भारताने स्पष्ट केले. 1959 मध्ये चिनी सैन्याने इथे घुसखोरी केली होती. त्यावेळी भारत आणि चीन यांच्यात संघर्ष बघायला मिळाला. अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील माजा आणि बिसा ही गावे आणि जो ला, रिजा ला, पुकुर ला हे मोक्याच्या ठिकाणचे पर्वतीय खिंडमार्ग यांचा अधिकृत नकाशात समावेश करण्यात आला आहे.

या यादीत शेर-ए-थापा स्मारक, छोटा रोपुक, बडा रोपुक, शिवाजी नगर, सुनपुरा, कामलांग नगर आणि बुद्ध मंदिर यासारख्या महत्त्वपूर्ण ठिकाणांचाही समावेश आहे. भारताच्या ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न चीनकडून केला गेला. आताही भारताने चीनचा नावे बदलण्याचा डाव उधळून टाकला. भारतीय प्रदेशांना कथित नावे देण्याच्या चीनच्या प्रयत्नांना भारताने सातत्याने विरोध केला आहे. भारतही याविरोधात निर्णय घेताना दिसतोय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us