AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिलासा, एकनाथ शिंदेंकडून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा

महाराष्ट्रात पाऊसच झाला नाही, त्यामुळे राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. खरीप हंगाम हातचा गेला आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या सर्व पार्श्वभूमीव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिलासा, एकनाथ शिंदेंकडून दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा
eknath shindeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 22, 2026 | 5:19 PM
Share

महाराष्ट्रात पाऊसच झाला नाही, त्यामुळे राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. खरीप हंगाम हातचा गेला आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांचं लक्ष आता सरकारच्या मदतीकडे लागलं आहे. दरम्यान उद्यापासून पंचनामे सुरू होणार आहेत. येत्या तीन दिवसांमध्ये दुष्काळाची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर बोलताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पंचनामे सुरू केले जाणार आहेत. पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना युद्धपातळीवर मदत केली जाईल अशी घोषणा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पहाणी करणार, शेतकऱ्यांचा दसरा दिवाळी काळी होऊ देणार नाही, असंही यावेळी शिंदे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले शिंदे? 

तातडीने पंचनामे होतील, ऊद्यापासून तालूका स्थरावर पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  पंचनामे सुरू होतील , मुख्यमंत्र्यांसह मी देखील अमरावती , अकोला विभागात जात आहे.  शिवसेनेच्या मंत्र्यांना देखील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  बळीराजा सगळ्यात महत्वाचा, तो अन्नदाता आहे. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. अतिवृष्टी झाली गारपीट झाली तेव्हा सरकार पाठीशी ऊभं राहीलं. महायूतीच्या सरकारने एनडीआरएफचे निकष डावलले. मागच्या वर्षी संकट आलं, तेव्हा सरकारने मदत केली. पंचनाम्यानंतर युद्धपातळीवर शेतकऱ्यांना मदत केली जाईल, शेतकऱ्यांची दसरा दिवाळी काळी होऊ देणार नाही.  आजची बैठक महत्वाची होती, दखल घेतली आहे , अंमलबजावणी ऊद्यापासून सुरू होईल, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

उद्यापासून पंचानामे 

राज्यात दुष्काळ पडला आहे, मात्र अजूनही दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाहीये. यावरून आता विरोधकांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत करा, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. दरम्यान त्यानंतर आता सरकार दरबारी देखील हालचाली वाढल्या असून, पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्यापासून पंचनाम्याला सुरुवात होणार आहे. येत्या तीन दिवसांमध्ये दुष्काळाची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे.

Follow Us
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा
Video : मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा, गणेशोत्सवाची अनोखी संकल्पना
आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा
Bhandara : आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा संताप
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा
Video: संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा, पाहून विश्वासच बसणार नाही
चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली
Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!