AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत करणार अमेरिकेचा गेम, डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मोठ हत्यार मिळालं; आता थेट…

India US Trade Deal : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प टॅरिफ रद्द केले आहे, त्यामुळे भारत आणि अमेरिकेत पुन्हा करार होण्याची शक्यता आहे. यात भारताला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

भारत करणार अमेरिकेचा गेम, डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात मोठ हत्यार मिळालं; आता थेट...
Donald Trump and TariffImage Credit source: Google
| Updated on: Feb 24, 2026 | 6:41 PM
Share

अनेक महिन्यांच्या वाटाघाटींनंतर काही दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराला तात्पुरती मंजूरी मिळाली होती. मात्र आता एक नवीन ट्विस्ट समोर आला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प टॅरिफ रद्द केले आहे, त्यामुळे भारत आणि अमेरिकेत पुन्हा करार होण्याची शक्यता असल्याचे आणि आता भारतासोबतचा करार पुन्हा लागू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. भारताने मागील करारात एक कलम जोडला होते, जे आता नवीन करारासाठी फायदेशीर ठरू शकते. याचा शस्त्र म्हणून वापर करता येऊ शकतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भारत-अमेरिका व्यापार कराराच्या वाटाघाटीच्या शेवटच्या टप्प्यात कलम 8 सामील करण्यात आले होते. भारताने स्वतःचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय घेतला होता. आता अमेरिकन न्यायालयाने ट्रम्प टॅरिफला बेकायदेशीर घोषित केले आहे, त्यामुळे कलम 8 ला खास महत्त्व प्राप्त झाले आहे. भारत आता करारावर पुन्हा वाटाघाटी करण्यासाठी कलम 8 चा वापर करण्याची शक्यता आहे. या कलमाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

कलम 8 काय आहे?

भारत-अमेरिका व्यापार करार अंतरिम होता, याचा अर्थ आगामी काळात यात बदल संभव होते. त्यामुळेच भारताने या करारात कलम 8 चा समावेश केला होता. कलम 8 मध्ये असे नमूद करण्यात आलेले होते की, “जर कोणत्याही देशाच्या शुल्कात काही बदल झाला तर दुसरा देश करारात बदल करू शकतो. ट्रम्प टॅरिफबाबत न्यायालयातील खटल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने हे कलम जोडले होते. आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने टॅरिफ रद्द केले आहे, त्यामुळे भारत व्यापार करारावर नवीन अटी लादण्यासाठी कलम 8 चा वापर करण्याची शक्यता आहे.

भारताला काय फायदा होणार?

न्यायालयाने IEEPA अंतर्गत डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला बेकायदेशीर घोषित केले आहे. त्यानंतर अमेरिकेने भारतावार 18% ऐवजी 15% शुल्क लादले. याचा अर्थ व्यापार करार अंतिम होण्यापूर्वीच शुल्क बदलले गेले आहेत. त्यामुळे आता भारत अमेरिकन वस्तूंवर पुन्हा शुल्क लादण्यासाठी कलम 8 लागू करू शकतो. यात भारताला फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत भारताने जास्त कठोर भूमिका घेतली तर करार रखडण्याची शक्यता आहे.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...