India-China : चीनचा शत्रू बनला भारताचा मित्र, ड्रॅगन श्रीलंका, बांग्लादेश, पाकिस्तानला हाताशी धरुन जे आपल्याविरोधात करतो, तेच आता आपण केलं
India-China : चीन प्रत्येक ठिकाणी दादागिरी करत असतो, जमीन असो वा समुद्र. त्यांच्या या दादागिरीला फक्त भारतचं नाही, अनेक देश कंटाळले आहेत. ते चीनला सणसणीत उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. असा चीनचा एक शत्रू देश आपला मित्र बनला आहे.

चीन बांग्लादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांशी मैत्री वाढवून सतत भारताला अडचणीत आणण्याच्या प्रयत्नात असतो. भारताला घेरण्याची त्यांची रणनिती आहे. आता भारताने सुद्धा तेच केलंय. दक्षिण चीन सागरात ड्रॅगनला घेरण्याची तयारी केलीय. याची पृष्टी भारताने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या वियतनाम दौऱ्याने झाली. या दौऱ्यात डोवाल वियतनामचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री जनरल लुओंग टॅम क्वांग यांची भेट घेतली. ते वियतनामच्या कम्युनिस्ट पार्टी केंद्रीय समिती पोलीत ब्युरोचे सदस्य सुद्धा आहेत. या दरम्यान डोवाल आणि लुओंग टॅम क्वांग यांच्यात उच्चस्तरीय सुरक्षा बैठक सुद्धा झाली. भारत आणि वियतनाम यांच्यात रणनिती आणि सैन्य संबंध बळकट होत असताना ही बैठक झाली. भारत आणि वियतनान दोन्ही देश चीनपासून असलेल्या धोक्याचा सामना करत आहेत. भारत-वियतनाम संबंध जितके बळकट होत जातील, तितक्या दक्षिण चीन सागरात चीनच्या अडचणी वाढतील.
भारत आणि वियतनाममध्ये काही संरक्षण करार होत आहेत, त्याचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. भविष्यात दोन्ही देशात अधिक क्षेत्रीय सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. दोन्ही देशातील क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटनाक्रमावर सुद्धा चर्चा झाली. परस्परांचे संबंध अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला. भारत आणि वियतनाममध्ये जुने संरक्षण संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये अनेक संरक्षण करार झाले आहेत. त्या शिवाय भारत आणि वियतनाममध्ये पोलीस सहकार्य वाढवण्याचा, गुन्हेगारांना पकडून त्यांचं प्रर्त्यपणासंदर्भात करार झाले.
हा शोध भारताकडे येऊन संपतो
भारत आणि वियतनाम दहशतादविरोधी, सायबर सुरक्षा, समुद्री सुरक्षा या विषयांवर एकत्र काम करत आहे. यात संयुक्त सैन्य आणि नौसैनिक अभ्यासाचाही समावेश आहे. वियतनामची सीमा सुद्धा चीनला लागून आहे. वियतनाम आणि चीनचा युद्धाचा इतिहास आहे. दक्षिण चीन सागरावरुन चीन आणि वियतनाम तिन्ही देशात वाद आहेत. म्हणून वियतनाम चीन विरोधात मदत करणाऱ्या विश्वासू आणि शक्तीशाली सहकार्याच्या शोधात आहे. वियतनाचा हा शोध भारताकडे येऊन संपतो. कुठलही भय किंवा शंका मनात न ठेवता वियतनाम भारतासोबतचे संबंध भक्कम करु शकतो.