AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे बडे नेते नाराज, सुनेत्रा पवार यांनी सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलावलं, बैठकीत होणार मोठा निर्णय

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये घडामोडींना वेग आला आहे. रविवारी रात्री राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यांनंतर आता सुनेत्रा पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादीचे बडे नेते नाराज, सुनेत्रा पवार यांनी सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलावलं, बैठकीत होणार मोठा निर्णय
Sunetra Pawar Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 02, 2026 | 7:18 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये घडामोडींना वेग आला आहे. रविवारी रात्री राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. पक्षामध्ये मोठे निर्णय घेतले जात असताना डावललं जात असल्याची तक्रार त्यांनी अमित शाह यांच्याकडे केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याबद्दल अमित शाह यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राष्ट्रादी अजित पवार गटातून मोठी बातमी समोर येत आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची तातडीने मुंबई बैठक बोलावली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची उद्या देवगिरी निवासस्थानी संध्याकाळी ७ वाजता बैठक होणार आहे.  आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडत असतानाच उद्या सुनेत्रा पवार यांनी मुंबईमध्ये पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. तब्बल चार महिन्यानंतर राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.  सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या बैठकीत काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.

बडे नेते नाराज? 

दरम्यान राष्ट्रवादीच्या काही बड्या नेत्यांनी रविवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान वरिष्ठ नेत्यांना डावलून पक्षात महत्त्वाचे निर्णय घेतले जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याबद्दल अमित शाह यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या भेटीमध्ये अर्थखात्याबाबत देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या पूर्वी राष्ट्रवादीकडे असलेलं अर्थखात आता भाजपकडे आहे. ते खात पुन्हा राष्ट्रवादीला मिळावं या संदर्भात देखील यावेळी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची उद्या मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठी खदखद, शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची
NCP Leader Meet Amit Shah : राष्ट्रवादीत मोठी खदखद, अमित शाहांच्या भेटीत राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची तक्रार? पार्थ आणि सुनेत्रा पवारांच्या भूमिकेवर नाराजी
बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
Devendra Fadnavis : काँग्रेसने बाबासाहेबांचं संविधान पायाखाली तुडवलं; फडणवीसांचा काँग्रेसवर निशाणा
उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला....
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना रेजीम चेंजचा अर्थ माहिती आहे की नाही? ठाकरेंना टोला लगावत नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?
शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस....
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती बिघडली, रुबी रुग्णालयात दाखल; पुढील दोन दिवस पूर्ण विश्रांतीचा सल्ला
तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाह...
Amit Shah : तेलंगाणातून काँग्रेसला उखडून फेकणार; हैदराबादच्या रॅलीत अमित शाहांचा निर्धार
सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवल
Sangali : सांगलीत सुनेच्या त्रासाला कंटाळून सासऱ्यानं जीवन संपवलं
दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत.....
Sanjay Ghadi On BJP : दिया मिर्झाच्या दिवाळी व्हिडीओवरून मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत मतभेद
दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये...
Ritu Tawde on Dia Mirza : दिया मिर्झाने हिंदूंना दिवाळी कशी साजरी करावी हे शिकवू नये; दिया मिर्झाच्या त्या व्हिडीओवरून महापौर आक्रमक
माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख कोणाकडे?
Ravindra Dhangekar : माझ्याकडे सर्वांचा सातबारा आहे...; रवींद्र धंगेकरांचा रोख नेमका कोणाकडे?
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची...
गोकुळ अध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा! कोर्टाचे आदेश काय? 25 संचालकांची महत्त्वपूर्ण सभा अन्...