India A Squad: अभिषेक-वैभवची सलामी, तिलक वर्मा कर्णधार अन् रजत पाटीदार उपकर्णधार; एशिया कपसाठी इंडिया ए चा संघ जाहीर!
Team India Squad Rising Stars Asia Cup 2026: बीसीसीआयने २०२६ च्या पुरुष रायझिंग स्टार्स आशिया कपसाठी भारत 'अ' संघाची घोषणा केली आहे. कर्णधारपद तिलक वर्माकडे असून, रजत पाटीदार उपकर्णधार असेल.

भारतीय निवड समितीने रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ साठी १५ सदस्यीय अत्यंत संतुलित आणि मजबूत ‘इंडिया ए’ संघाची घोषणा केली आहे. १९ ते २९ नोव्हेंबर दरम्यान कतारमधील दोहा येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी युवा आणि स्फोटक फलंदाज तिलक वर्माची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दोन आयपीएल ट्रॉफींमध्ये आपल्या प्रभावी कर्णधारपदाने आणि कामगिरीने छाप पाडणाऱ्या रजत पाटीदारला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
संघाच्या फलंदाजीच्या आक्रमणात अनुभव आणि तरुण ऊर्जेचा उत्तम संगम दिसून येत आहे. ऑपनिंगसाठी अभिषेक शर्मा आणि विक्रमवीर युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यांच्यासारखे खेळाडू आहेत. जे पॉवरप्लेमध्ये कोणत्याही गोलंदाजी आक्रमणाची धुलाई करण्याची क्षमता ठेवतात. मधल्या फळीत यष्टीरक्षक-फलंदाज प्रभसिमरन सिंग, कुमार कुशाग्र आणि धोकादायक फिनिशर रिंकू सिंग यांच्यासोबत सूर्यांश शेडगे यांचा समावेश आहे. जो शेवटच्या षटकांमध्ये जलद धावा करून सामन्याचे चित्र पालटण्यात पटाईत आहे.
संघ व्यवस्थापनाने अष्टपैलू विभागात विविधतेवर लक्ष केंद्रित केले आहे. शहबाज अहमद, विप्राज निगम, हर्ष दुबे आणि तनुष कोटियन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. हे अष्टपैलू खेळाडू केवळ मधल्या फळीत धावा करण्यास सक्षम नाहीत, तर कतारच्या फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर आपल्या अचूक गोलंदाजीने विरोधी संघांना रोखण्यासही मदत करतील. त्यांच्या उपस्थितीमुळे कर्णधार तिलक वर्मा यांना उत्कृष्ट गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध होतील.
🚨 News 🚨
India A squad for upcoming ACC Rising Stars Asia Cup announced 📝
More details ▶️ https://t.co/JRdPQ31UPA
#RisingStarsAsiaCup https://t.co/4k2vJAE4kh
— BCCI (@BCCI) November 2, 2026
वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व एका तरुण आणि प्रभावी संघाने केले आहे. अलीकडेच आपल्या वेगाने छाप पाडलेल्या हर्षित राणा गोलंदाजीचे नेतृत्व करेल. तर प्रिन्स यादव आणि अर्शद खान त्याला साथ देतील. ही त्रिकूट सुरुवातीच्या षटकांमध्ये नवीन चेंडू स्विंग करण्याची आणि अखेरच्या षटकांमध्ये आपल्या गोलंदाजीतील विविधतेचा वापर करून बळी घेण्याची क्षमता ठेवते. भारत ‘अ’ संघाला पाकिस्तान ‘अ’, नेपाळ आणि युएई यांच्यासोबत ‘ब’ गटात स्थान देण्यात आले आहे. ते २० नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. यानंतर २२ नोव्हेंबर रोजी बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना होईल.
भारत ‘अ’ संघाचा संपूर्ण संघ भिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंह (विकेटकीपर), तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), रिंकू सिंह, कुमार कुशाग्र (विकेटकीपर), सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विपराज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियन, हर्षित राणा, प्रिंस यादव और अरशद खान
