AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला दणका, डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर थेट काढला खळबळ उडवणारा आदेश..

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहेत. मात्र, आता त्यांना अखेर अमेरिकेच्या कोर्टाने अत्यंत मोठा दणका दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टाच्या आदेशानंतर धक्कादायक निर्णय घेतला.

भारताला दणका, डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टाच्या निर्णयानंतर थेट काढला खळबळ उडवणारा आदेश..
Donald Trump
| Updated on: Feb 21, 2026 | 9:03 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगातील अनेक देशांवर भरमसाठ टॅरिफ लावताना दिसले. एखाद्या देशाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही की, लाव टॅरिफ अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांची बघायला मिळाली. हेच नाही तर इराणसोबत वाढलेल्या तणावानंतर थेट इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवर 25 टक्के टॅरिफ लावण्याचे आदेश त्यांनी काढले. एखादा देश आपले ऐकत नसल्याचे लक्षात येताच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पाडण्यासाठी टॅरिफ लावला जात होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ नितिला मोठा धक्का अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला. हेच नाही तर कोर्टाने स्पष्टपणे म्हटले की, डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कोर्टाच्या दणक्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे आदेश काढून थेट जगातील सर्वच देशांवर अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. भारतावरही मोठा टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प यांनी लावला. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने 50 टक्के टॅरिफ सुरूवातीला लावण्यात आला.

याचा परिणाम भारताच्या अनेक व्यवसायावर झाला. भारतातून अमेरिकेत होणारी निर्णयात जवळपास कमी झाली. अमेरिकेत वस्तूही पाठवणे कठीण झाले. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरील 50 टक्के टॅरिफ मागे घेऊन 18 टक्के टॅरिफ केला. पण मोठी अट ठेवत म्हटले की, जर तुम्ही रशियाकडून तेल खरेदी पुन्हा सुरू केली तर आम्ही तुमच्यावर परत 50 टक्के टॅरिफ लावू म्हणजे भारतावर टांगती तलवार कायम होती.

आता डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयानंतर पुन्हा एकदा भारताला दणका बसला आहे. भारतावर अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ लागणार आहे. यामुळे आता मूळ असलेला 18 आणि अतिरिक्त असा 28 टक्के टॅरिफ डोनाल्ड ट्रम्प भारतावर लावू शकतात. भारतातून मोठ्या संख्येने अमेरिकेत निर्यात होते. पण टॅरिफमुळे ती निर्यात जवळपास बंद झाली होती.

कपडे, स्टील आणि एल्यूमिनियमच्या गोष्टी भारतातून अमेरिकेत निर्यात होतात. भारताला अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ भरावा लागेल. मात्र, हा टॅरिफ मागील काही दिवसांचा विचार करता अत्यंत कमी आहे. भारतीय कंपन्या आता अरबो डॉलरच्या टॅरिफसाठी रिफंड क्लेम करू शकतात.

Follow Us
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...