America Midterm Election : डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यावधी निवडणुकीत पराभव, भारताचा ताकद चांगलीच वाढली, होणार फायदाच फायदा!

म्प यांची दोन्ही सभागृहांतील ताकद काहीशी कमी झाली आहे. विरोधकांचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विरोधकांच्या विरोधाला ट्रम्प यांना सामोरे जावे लागणार आहे.

America Midterm Election : डोनाल्ड ट्रम्प यांचा मध्यावधी निवडणुकीत पराभव, भारताचा ताकद चांगलीच वाढली, होणार फायदाच फायदा!
donald trump and america election
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 9:33 PM

America Election Result Update : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबर धक्का बसलाय. प्रतिनिधी सभागृह आणि सिनेट अशा दोन्ही सभागृहांच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागलेय. या पराभवानंतर आता कोणताही निर्णय घेताना ट्रम्प यांना विरोधकांच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, या निवडणुकीमुळे जागतिक राजकारणही बदलणार आहे. भारतालाही या निवडणुकीचा चांगला फायदा होऊ शकतो.

निवडणुकीमुळे आता जागतिक राजकारण बदलणार?

या निवडणुकीनंतर आता ट्रम्प यांची दोन्ही सभागृहांतील ताकद काहीशी कमी झाली आहे. विरोधकांचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विरोधकांच्या विरोधाला ट्रम्प यांना सामोरे जावे लागणार आहे. याचाच परिणाम म्हणून कोणतेही जागतिक धोरण ठरवताना ट्रम्प यांना विरोधक आडकाठी करू शकतात. म्हणूनच जागतिक राजकारणाला कलाटणी देणारे निर्णय घेताना ट्रम्प यांना विचार करावा लागणार आहे.

Loading...

डेमॉक्रॅटिक पक्षाची ताकद वाढली, ट्रम्प यांना नवे आव्हान

अमेरिकेतील महागाई, टॅरिफ तसेच इतर स्थानिक पातळीवरील कारणांमुळे मतदारांनी विरोधी बाकावर असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाला भरपभरून मतं दिली. आता प्रतिनिधी सभा आणि सिनेट अशा दोन्ही सभागृहांत डेमोक्रॅटिक पक्षाची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे ट्रम्प कोणताही निर्णय एकतर्फी आणि मनमानी पद्धतीने घेऊ शकणार नाहीत. डोनाल्ड ट्रम्प टॅरिफची धमकी देत भारतासह इतरही देशांना अमेरिकेत गुंतवणूक करण्यास भाग पाडत होते. याच धमक्यांना बळी पडून जपानने 500 अब्ज डॉलर्स दक्षिण कोरियाने 350 अब्ज डॉलर्स अमेरिकेत गुंतवण्याचे आश्वासन दिले होते. आता यावरही पुन्हा नव्याने विचार करण्याची संधी मिळू शकते.

भारताला काय फायदा होऊ शकतो?

भारताच्या बाबतीत बोलायचे झाल्यास भारतालाही याचा फायदा होऊ शकतो. 2025 साली अमेरिकेने भारतावर 18 टक्के टॅरिफ लावला होता. आता भारतावर टॅरिफ लावायचा असेल तर ट्रम्प यांना एकतर्फी निर्णय घेता येणार नाही. भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, असे अमेरिकेचे मत असते. तुम्ही तेल खरेदी केले तर आम्ही तुमच्यावर कठोर प्रतिबंध लावू, असे अमेरिकेकडून सांगितले जाते. अशा प्रकारची भूमिका घेतानाही आता ट्रम्प यांना थोडा विचार करावा लागेल. यासह इतरही अनेक पातळ्यांवर भारताला फायदा होऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us